Kedarnath Viral Video Saamtv
व्हायरल न्यूज

Kedarnath Viral Video: देव भूमीत राक्षसी कृत्य! केदारनाथमध्ये तरुणांनी घोड्याला पाजली सिगारेट; संतापजनक VIDEO...

Kedarnath Horse Smoke Viral Video: या व्हिडिओची गंभीर दखल घेतली असून त्या दोन तरुणांची ओळख पटवण्यासाठी प्रयत्न करत असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे.

Gangappa Pujari

Kedarnath Horse Viral Video: उत्तराखंडमधून (Uttarakhand) एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. उत्तराखंडमध्ये सध्या केदारधाम (Kedarnath Dham) यात्रा सुरू आहे. या यात्रेच्या ठिकाणी एका घोड्याला जबरदस्तीने नशा करायला लावले जात असल्याचा धक्कादायक व्हिडिओ समोर आला आहे. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर सोशल मीडियावर संतापाची लाट उसळली असून तरुणांवर कडक कारवाई करण्याची मागणी होत आहे. (Viral Video News)

याबाबत अधिक माहिती अशी की, देशात 12 ज्योर्तिलिंगापैकी उत्तराखंडमधील केदारनाथ (Kedarnath) मंदिर एक आहे. देशभरातील लाखो भाविक या ठिकाणी दर्शनासाठी येत असतात. यावेळी भाविक घोड्यांवर बसूनही प्रवास करत असतात. मात्र या घोड्यांना जबरदस्तीने नशा करायला लावण्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ज्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

या व्हायरल व्हिडिओमध्ये दोन तरुण घोड्याचे तोंड पकडून त्याला सिगारेट ओढायला लावत असल्याचे दिसत आहे. यावेळी तो घोडा चांगलाच अस्वस्थ झाला. मात्र तरीही ते दोन्ही तरुण त्याला जबरदस्तीने सिगारेट पाजत आहेत. हा संतापजनक घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

हा व्हिडिओ (Viral Video) व्हायरल झाल्यानंतर नेटकऱ्यांनी त्यावर कडक शब्दात संताप व्यक्त केला आहे. या ठिकाणी आल्यानंतर अनेक प्रवासी घोड्याचा वापर करत असतात. मात्र अशाप्रकारे नशा करायला लावल्याने प्रवाशांचा अपघात होवू शकतो.. अशी चिंता अनेकांनी व्यक्त केली आहे. तर काही जणांनी देवाच्या दारात अशी कृत्ये करणाऱ्यांना कडक शिक्षा व्हावी अशीही मागणी केली आहे.

दरम्यान, हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनीही कठोर पाऊले उचलली आहेत. आम्ही या व्हिडिओची गंभीर दखल घेतली असून त्या दोन तरुणांची ओळख पटवण्यासाठी प्रयत्न करत असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे. तसेच अशा घटना आढळल्यास तात्काळ पोलिसांना कळवण्याचेही आवाहन भाविकांना केले आहे... (Latest Marathi News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Chest congestion: छातीत घट्ट पिवळा कफ साचलाय? हे 7 घरगुती उपाय करून पाहा, लगेच सैल होईल कफ

Accident : एक्सप्रेसवेवर भीषण अपघात! ट्रकला धडकून पिकअपचा चेंदामेंदा; ६ भाविकांचा मृत्यू, १४ गंभीर जखमी

Manoj Jarange: मनोज जरांगेंच्या उपोषणाचा चौथा दिवस, वैद्यकीय तपासणीला नकार; अंतरवाली सराटीत नेमकं काय घडतंय?

Lek Ladki Yojana : मुलींसाठी सरकारची मोठी योजना! ₹1.01 लाख थेट मदत; फक्त या कुटुंबांनाच मिळणार लाभ

Maharashtra News Live Update: गणेशोत्सव मिरवणुकीमध्ये लेझर लाईटचा वापर करण्यास निर्बंध

SCROLL FOR NEXT