लड्डू मुत्या Saam tv
व्हायरल न्यूज

Fact Check: पंखा थांबवून लड्डू मुत्त्या बाबाचा भक्तांना आशीर्वाद? काय आहे व्हायरल व्हिडिओमागचं सत्य? VIDEO

Laddu Mutya Baba news : आता बातमी आहे एका लड्डू मुत्त्याबाबाची...हाताने पंखा थांबवून भक्तांना आशिर्वाद देणाऱ्या या बाबाचा व्हिडिओ तुफान व्हायरल होतोय...पंख्याची धूळ लावून आशिर्वाद देणाऱ्या या बाबाच्या व्हिडिओची आम्ही पडताळणी केली...त्यावेळी या भोंदूचा पर्दाफाश झालाय...पाहुयात हा रिपोर्ट...

Sandeep Chavan

मुंबई : लड्डू मुत्त्या बाबा ...स्वत:ला हा, बाबा समजतो...याचे भक्त या बाबाला खुर्चीवर उचलून घेतात आणि हा बाबा हाताने पंखा थांबवतो आणि पंख्याची धूळ भक्तांच्या डोक्याला लावून आशिर्वाद देतो. त्याचा व्हिडिओ तुफान व्हायरल होतोय...या बाबाचे एवढे भक्त वाढलेयत की सोशल मीडियावरही रिल्स बनवणाऱ्यांनी धुमाकूळ घातलाय.

लड्डू मुत्त्या बाबा कर्नाटकातील बागलकोट जिल्ह्यातला आहे. मात्र, हा बाबा वादात सापडलाय...या बाबाचा पर्दाफाश करण्यात आलाय .तुम्ही व्हायरल व्हिडिओ आणि हे कसं शक्य आहे ते पाहिलं तर तुम्हीही यावर विश्वास ठेवणार नाही. एका व्हिडिओत लड्डू मुत्त्या बाबा आहे तर दुसऱ्या व्हिडिओ डॉ. पुनीत कुमार यांचा आहे. लड्डू मुत्त्या बाबाचा पर्दाफाश करणारा हा व्हिडिओ आहे. बाबा जो चमत्कार दाखवतो हा चमत्कार नाही...हे विज्ञानानं शक्य आहे.

बघितलंत...मात्र, हा लड्डू मुत्त्या बाबा लोकांना चमत्कार दाखवण्याच्या नावाखाली फसवणूक करत होता...अंधश्रद्धा निमूर्लन समितीने तर थेट चमत्कार करून दाखवणाऱ्या भोंदूबाबाला आव्हान दिलंय...चमत्कार सिद्ध केल्यास 21 लाखांचं बक्षीस अंनिसने जाहीर केलंय...

व्हायरल सत्य काय? लड्डू मुत्त्या बाबाचा चमत्कार नाही, हे विज्ञानानं शक्य आहे. पंखा थांबवण्यामागे विज्ञानाचा आधार आहे. लड्डू मुत्त्या बाबाने चमत्कार म्हणून भक्तांना मोहात पाडलं. फसवणूक करून आर्थिक फायदा घेतला.

...त्यामुळे असे व्हिडिओ पाहून अशा भोंदूबाबांवर विश्वास ठेवू नका...चालता पंखा थांबवण्याची ही टेक्निक आहे...असं असलं तरी तुम्ही असा प्रयोग करू नका...कारण, यामुळे हाताला इजाही होऊ शकते...हातचलाखी करून लोकांना लुबाडण्याचा हा धंदा आहे...त्यामुळे अंधश्रद्धेच्या आहारी जाऊ नका...असे बाबा लोकांना भूलथापा देऊन गंडा घालतात...आमच्या पडताळणीत हा बाबा भोंदू असून, लोकांना गंडा घालत असल्याचं समोर आलंय...

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

शेतकऱ्यांच्या सुख-समृद्धीसाठी मावळात महाचंडी आणि महापर्जन्य याग; 6000 भाविकांचा सहभाग

IAS Transfer: 4 आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या, राज्याच्या प्रशासनात मोठा फेरबदल

‘मोदी का बाप भी जाएगा’,भरसभेत खरगेंच्या विधानाने राजकारण तापलं! मोदींचं समर्थन करणाऱ्या तरुणालाही मारहाण

देशाच्या नंदनवनात साकारतोय भव्य रेल्वे प्रकल्प! 12 स्थानकं, 28 बोगदे अन् 57 पुलांचं जाळं; 83 टक्के प्रवास बोगद्यातून

2-3 महिन्यांत राजकारणात मोठी उलथापालथ; राज्यातील नेत्यांचे राजकीय भूकंपाचे संकेत

SCROLL FOR NEXT