Mother and Daughter Funny Video Saam Digital
व्हायरल न्यूज

Viral Video: मुलीने आईला सांगितली १ मिनिटाची गोष्ट, शेवट ऐकून आईला हसू आवरेना, पाहा VIDEO

Mother and Daughter Funny Video: प्रत्येकाने हसत हसत आनंदाने आयुष्य जगलं पाहिजे. असं म्हणतात की, हसल्याने आपलं आयुष्य वाढतं.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Mother and Daughter Funny Video

प्रत्येकाने हसत हसत आनंदाने आयुष्य जगलं पाहिजे. असं म्हणतात की, हसल्याने आपलं आयुष्य वाढतं. आता दिवसभरातील ताण, थकवा दूर करण्यासाठी अनेक जण कॉमेडी शो पाहतात.

मात्र आपल्या रोजच्या बोलण्यातून छोट्या आणि साध्या विनोदानेही चेहऱ्यावर हसू येते. आपल्या आईला सर्व कामांतून विरंगुळा म्हणून एका मुलीने आईशी अशीच काही मजा मस्ती केलीये. आईला जोक सांगत मुलीने जे केलंय ते पाहून आई शेवटी खळखळून हासली आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

या दोन्ही मायलेकीचा व्हिडीओ सोशल मिडीया जोरदार व्हायरल होतोय. व्हायरल व्हिडीओत तुम्ही पाहू शकता की, ज्यात दोघीही एका रूममध्ये बसलेल्या आहेत. त्यानंतर तरुणी आपल्या आईला एक काल्पनिक गोष्ट सागंत असते. तिची आईपण ती सांगत असलेली गोष्ट लक्ष देऊन ऐकते. अशातच ती आईला विचारते की, एक बर्फाच्छादित परिसर असून तिथे लहान आकाराचा उंदीर आहे. उंदराने थंडिपासून वाचण्यासाठी अगंभर डब्बल डब्बल कपडे घातले आहे तसेच उंदीरही जाड आहे.

त्यानंतर उंदीर खूप धावतो आणि थकून जातो त्यामुळे त्याला गरम होण्यास सुरूवात होते. अशा प्रकारे पूर्ण गोष्ट रगंवून ती आईला सांगते. शेवटी मन लावून गोष्ट ऐकणाऱ्या आईला बोलते की उंदराला पळून पळून गरम झाल्यामुळे उंदराच जॅकट काढते आणि आईच्या हातात देते अन् आईही अदृश्य रूपातील जॅकट पकडते. शेवटी तरूणी आईला विचारते की, माझ्या हातात उंदीर होता का? त्यावर आई बोलते की इथं उंदीर कसा असेल तर त्यावर तरुणी बोलते,'तू कसं जॅकट पकडलं मग....' अशा प्रकारच्या गंमतशीर संवाद माय-लेकीमध्ये झाला

माय-लेकीचा गंमतीदार व्हिडिओ एक्स अर्थात ट्वीटर अॅपवरील @BhoolNaJaana या अकाउंटवर साधारण २३ डिसेंबर रोजी पोस्ट करण्यात आला आहे. व्हिडिओत 'गोंडस मुलगी म्हणाली तर तिच्या हातात डायनासोर होता हेही मी मान्य करू शकतो'अशा प्रकारचे गंमतशीर कॅप्शन लिहिण्यात आले आहे. माय-लेकीचा व्हिडिओ कोणत्या शहरातील आहे अद्याप हे कळू शकले नाही. मात्र व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

व्हायरल व्हिडिओवर नेटकऱ्यांच्या गमतीशीर प्रतिक्रिया येत आहेत. तरुणीचा व्हिडिओ शेअर होताच सोशल मीडिया यूजर्संकडून व्हिडिओला हजारोंच्या घरात व्ह्यूज मिळालेत. एका यूजरने कमेटस् करत लिहिले आहे की, खरं बोलीस..'तसेच आणखी अन्य यूजर्संनी हसण्याचे इमोजी कमेंटस् बॉक्समध्ये पाठवले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: शिवसेना ठाकरे गटाच्या अखिल चित्रे यांनी मंत्री नितेश राणे यांना डिवचले

BJP National President: भाजपला पहिल्यांदा मिळू शकतात महिला राष्ट्रीय अध्यक्ष, ३ नावं आहेत चर्चेत

Shirdi : साई संस्थानची बदनामी केल्यास फौजदारी गुन्हा दाखल होणार | VIDEO

Sara Tendulkar: सचिन तेंडुकरच्या लाडक्या लेकीचे नविन ग्लॅमरस फोटो तुम्ही पाहिलेत का?

New Electric Bike Launch : बाईक रायडर्ससाठी गुड न्यूज! फक्त २५ पैशांमध्ये १ किमी धावेल ही इलेक्‍ट्रिक टू-व्हीलर, जाणून घ्या किंमत आणि वैशिष्ट्ये

SCROLL FOR NEXT