Government employees are advised to avoid political posts on social media during the election period to prevent disciplinary action. Saam Tv
व्हायरल न्यूज

राजकारण कराल तर सरकारी नोकरी गमवाल? राजकीय स्टेटस, कमेंट्स करणं पडेल महागात?

Viral Claim Verified: तुम्ही सोशल मीडियात प्रचाराचे स्टेटस ठेवताय तर सावध व्हा...तुमच्यावर कारवाई होऊ शकते...होय, सरकारी कर्मचाऱ्यांची नोकरीही जाऊ शकते असा दावा करण्यात आलाय...पण, प्रचाराचे स्टेटस ठेवणं गुन्हा आहे का...?

Sandeep Chavan

सरकारी नोकरदार असाल तर वेळीच सावध राहा...कारण, राजकीय प्रचार कराल तर नोकरी गमावून बसाल...होय, असा दावा करणारा मेसेज व्हायरल केला जातोय...पण, खरंच सरकारी नोकरी असलेल्यांनी राजकीय प्रचार, स्टेटस ठेवणं गुन्हा आहे का...? सोशल मीडियावर अनेकजण प्रचार करतात...मग सरकारी कर्मचाऱ्यांवर कारवाई कशी केली जाते...? असे अनेक प्रश्न उपस्थित होतायत...त्यामुळे आम्ही या दाव्याची पडताळणी सुरू केली..

सरकारी कर्मचाऱ्यांना प्रचारात सहभागी होणं महागात पडणार आहे. सोशल मीडियावर राजकीय स्टेटस, पोस्ट, रील्स, शेअर केल्यास सरकारी सेवकांना नोकरी गमवावी लागू शकते.

हा मेसेज व्हायरल होत असल्याने आम्ही याची पडताळणी सुरू केली...कारण, बरेच जण सोशल मीडियावरून प्रचार करत असतात...सरकारी कर्मचारीही आपल्या जवळच्या उमेदवाराचा प्रचार करतात...त्यामुळे याची सत्यता जाणून घेणं गरजेचं आहे...या दाव्यात तथ्य आहे का हे जाणून घेण्यासाठी आम्ही तज्ज्ञांचा सल्ला घेतला...

सरकारी नोकरदारांनी प्रचार केल्यास कारवाई होते

पोस्ट, कमेंट, राजकीय बाजू घेणे बेकायदेशीर

राजकीय स्टेजवर उभं राहणं, डीपी बदलणे अप्रत्यक्ष प्रचार

यामध्ये कारणे दाखवा नोटीस चौकशी निलंबन

गंभीर प्रकरणात नोकरीवरून बडतर्फ केलं जातं

सरकारी कर्मचाऱ्यांसह कंत्राटी मानधनावरचे आऊटसोर्स कर्मचाऱ्यांनाही ही नियमावली लागू आहे...सरकारी कर्मचारी प्रचार करत असल्यास जिल्हा निवडणूक अधिकारी, तहसीलदार प्रांताधिकारी, सी विजिल अॅप आणि हेल्पलाईन नंबरवर तक्रार करता येते...त्यामुळे आमच्या पडताळणीत राजकारण कराल तर सरकारी नोकरी गमवाल हा दावा सत्य ठरलाय...

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

राज ठाकरेंच्या मनसेचे २ उमेदवार गायब? राजकीय वर्तुळात खळबळ

कल्याणमध्ये मोठी राजकीय घडामोड; दोन दिग्गज नेत्यांची एकत्र बैठक, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

ऐन निवडणुकीत एकनाथ शिंदेंना मोठा धक्का; बड्या नेत्याचा शिवसेनेला 'जय महाराष्ट्र'

Ladki Bahin eKYC: थर्टी फर्स्टची डेडलाईन तरी ई-केवायसी सुविधा सुरूच; लाडक्या बहिणींना दिलासा की तांत्रिक घोळ?

Friday Horoscope : नव्या वर्षाचा पहिला शुक्रवारी ठरेल लकी; जुळणार प्रेमाच्या रेशीम गाठी, ५ राशींच्या लोकांचं नशीब फळफळणार

SCROLL FOR NEXT