Viral Video Saam Tv
व्हायरल न्यूज

Viral Video: कसली घाई... ओव्हरटेक करायला गेला अन् भरधाव कारला धडकला, स्कूटीचा अक्षरशः चक्काचूर; घटना सीसीटीव्हीत कैद

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

सोशल मीडियावर कायम अनेक रस्ते अपघाताचे थरारक व्हिडिओ व्हायरल होत असतात. व्हायरल होत असलेल्या व्हिडिओ पाहून वाहतुकीच्या नियमांचे पालन करणे अत्यंत आवश्यक आहे, हे समजते. मात्र असे असूनही काही वाहन चालक वाहन चालवताना निष्काळजीपणा करतात आणि मोठ्या अपघातांना बळी पडतात. सध्या सोशल मीडियावर एका अपघाताचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. ज्यात एका व्यक्तीला ओव्हरटेक करणे चांगलेच महागात पडलेले आहे.

भररस्त्यावर बाईक स्टंट (Stunt) करणं याचे प्रमाण तरुणामध्ये आपल्याला कायम दिसून आले आहेत. सोशल मीडियावर यासंबंधित अनेक सीसीटीव्ही फुटेज व्हायरलही झालेले आहेत. अनेकदा भररस्त्यात बाईक स्टंट करताना किंवा कोणत्याही वाहनाला ओव्हरटेक करताना अनेकांना स्वता:चा जीव गमवावा लागलेला आहे. मात्र सध्या व्हायरल होत असलेला व्हायरल व्हिडिओ (Video) पाहून तुम्हाला अंगावर शहारा आल्याशिवाय राहणार नाही.

व्हायरल (Viral) होत असलेल्या व्हिडिओ एक महामार्ग दिसून येत आहे. या महामार्गावर अनेक वाहनांची ये-जा होत आहे. मात्र काही वेळात या मार्गावरून एक समोरच्या दिशेला एक ऑटो रिक्षा जाते त्यापाठी एक पांढऱ्या रंगाची कार आहे. जर व्हिडिओत नीट पाहिले तर दिसेल की एक व्यक्ती कारच्या पाठीमागून स्कूटीवर येत आहे.

परंतू ओव्हरटेक (Overtake) करण्याचा त्याचा प्रयत्न फसून गेलेला आहे. ज्या वेळी तो पांढऱ्या कारला ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न करतो , तेवढ्यात समोरच्या दिशेने भरधाव वेगात एक कार येते. याच कारचा जोरदार धक्का त्याच्या स्कूटीला लागतो. नशिबाने त्या व्यक्तीला काही दुखापत न होतो. त्याच्या स्कूटीचा पार चक्काचूर झालेला दिसून येत आहे. संपूर्ण घटना परिसरातील सीसीटीव्हीमध्ये कैद झालेली आहे.

सध्या व्हायरल सीसीटीव्ही (cctv) सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ''एक्स''वरील ''@gharkekalesh'' या अकाउंटवर शेअर करण्यात आलेली आहे. व्हिडिओ शेअर होताच अनेक सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर वेगाने पाहिला जात आहे. व्हिडिओ पाहिल्यानंतर अनेक यूजर्संनी विविध प्रतिक्रिया केलेल्या आहेत, त्यातील एका यूजरने लिहिले आहे की,''थोडक्याच बचावला पठ्ठ्या'' तर दुसऱ्या यूजरने लिहिले आहे की,''अशा लोकांसोबत असचं घडले पाहिजे'' तर अनेकांनी संतापजनक (Infuriating )प्रतिक्रिया या व्हायरल सीसीटीव्ही पाहून दिलेल्या आहेत. सोशल मीडियावर याआधीही असे अनेक सीसीटीव्ही फुटेज व्हायरल झालेले आहेत.

टीप : हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याची पडताळणी झालेली नाही. फक्त माहिती म्हणून आम्ही वाचक-प्रेक्षकांपर्यंत ही बाब पोहचवत आहोत. याचं आम्ही कोणत्याही प्रकारे समर्थन करत नाही.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Badlapur Case : बदलापूर अत्यार प्रकरणी मोठी अपडेट; एसआयटीकडून कोर्टात २ चार्जशीट दाखल, पाहा व्हिडिओ

Bharat Gogavale: महामंडळावर बोळवण, मंत्रिपदाची हुलकावणी; भरत गोगावले एसटीचं अध्यक्षपद स्वीकारणार?

NPS Vatsalya Scheme: तुमच्या मुलांनाही मिळणार पेन्शन! महिन्याला गुंतवा हजार, मुलं होतील कोट्याधीश; जाणून घ्या काय आहे योजना

UPI स्कॅम कसा ओळखायचा? तुमचे पैसे सुरक्षित करण्यासाठी या टिप्स करा फॉलो

Mhada Lottery 2024: म्हाडा लॉटरी घरांसाठी शेवटच्या दिवशी 'पेमेंट फेल'चा फटका! घराचे स्वप्न पूर्ण होणार का? शेकडो अर्जदार चिंतेत

SCROLL FOR NEXT