Dance Viral Video Saam Tv
व्हायरल न्यूज

Dance Viral Video: मरीन ड्राइववर लावणीची जुगलबंदी! ढोलकीच्या तालावर लावले ठुमके; पाहा तरुणांचा हटके अंदाज

Viral Video: सोशल मीडियावर दररोज अनेक डान्सचे व्हिडिओ तुम्ही पाहिले आहेत त्यात सध्या दोन तरुणांचा डान्स व्हिडिओ व्हायरल होत आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

''मरीन ड्राइव'' हे ठिकाण प्रत्येक मुंबईकर नाही तर प्रत्येक व्यक्तीला माहित आहे. कॉलेज बंक केलेल्या विद्यार्थ्यांचे शिवाय अनेक कपलचे तर मित्र- मैत्रिणीच्या विरंगुळ्याचे असे हे ठिकाण. मरीन ड्राइव या ठिकाण सोबत प्रत्येकाच्या अनेक आठवणी आहेत. दरदिवशी मरीन ड्राइववर हजारोंच्या संख्येने नागरिक येत असतात. हजारोंच्या नागरिकांमध्ये अनेक गोष्टी तेथे घडत असतात. मग काय सोशल मीडियावर त्याचे व्हिडिओही आपल्याला पाहायला मिळतात.सध्या मरीन ड्राइववरील एक व्हिडिओ व्हायरल होत आहे.

तरुणाई म्हणजे अनेक असंख्य स्वप्ने, लढण्याचे बळ आणि नवीन ऊर्जा. सोशल मीडियावर तुम्ही तरुण मुलां-मुलीचे तसेच अनेक तरुण- तरुणींचे डान्सचे व्हिडिओ(Video) पाहत आलात. कधी कॉलेच्या कार्यक्रमातील असतील तर कधी लग्नाच्या वरातीत डान्स असलले. मात्र सध्या मरीन ड्राइववर केलेल्या लावणीचा दोन तरुणांचा व्हिडिओ सध्या सर्वत्र मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून चर्चेत आलेला आहे.

व्हायरल होत असलेला व्हिडिओ (Video)सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवरील ''rajdancer2021'' या अकाउंटवर पोस्ट करण्यात आलेला आहे. व्हिडिओ सोशल प्लॅटफॉर्म शेअर होताच ३४ हजारांच्या घरात लाईक्स मिळाले आहेत तर मोठ्या प्रमाणात व्हिडिओला व्ह्यूज मिळत आहे. व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये ''मरीन ड्राइव वर लावणी केली कशी वाटली नक्की सांगा'' असे लिहिण्यात आलेले आहे. शिवाय व्हिडिओ पोस्ट होताच अनेक प्रतिक्रिया आलेल्या आहेत.त्यातील पहिल्या यूजरने लिहिले आहे की,''क्या बात है'' तर एका यूजरने लिहिले आहे की,'' तरुणी फिक्या या डान्स समोर''.

टीप : हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याची पडताळणी झालेली नाही. फक्त माहिती म्हणून आम्ही वाचक-प्रेक्षकांपर्यंत ही बाब पोहचवत आहोत. याचं आम्ही कोणत्याही प्रकारे समर्थन करत नाही

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Fact Check: NEETचा पेपर पुन्हा फुटला? टेलिग्रामवरून NEETची प्रश्नपत्रिका व्हायरल?

बेस्टचा संप, रिक्षाचालकांकडून लूट, सामच्या स्टिंगमध्ये लुटीचा पर्दाफाश

उद्धव ठाकरेंना आणखी एक धक्का बसणार? ठाकरेसेनेचे 14 आमदार फूटणार; राजकारणात खळबळ

ओमराजे फुटले, 15 हजार फॉलोअर्स घटले, सोशल मीडियावर ओमराजेंविरोधात संताप

फुलांच्या वर्षावात, राजाभाऊ नाशकात, कोट्यवधींची ऑफर धुडकावणारे राजाभाऊ, ठाकरेंच्या निष्ठावानानं फोडलं ऑपरेशन टायगरचं बिंग

SCROLL FOR NEXT