Viral Video Digital News
व्हायरल न्यूज

Viral Video: सिग्नलला गाड्या थांबताच तरुणी रस्त्यावर झोपून नाचू लागली; ओ बावरीया गाण्यावर धरला ठेका VIDEO व्हायरल

Dance Video: सध्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून अनेकजण प्रकाशझोतात येत असतात.अशातच सोशल मीडियावर एका तरूणीचा व्हिडिओ तूफान व्हायरल होतोय.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Giral Dance Video

सध्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून अनेकजण प्रकाशझोतात येत असतात. अनेक तरूण- तरूणींनीमध्ये सोशल मीडियावर फेसम होण्यासाठी चढाओढ पाहण्यास मिळत आहे. मुंबईत असो वा इतर सार्वजनिक ठिकाणी रिल्स बनवण्याचे प्रमाण वाढले आहे. अशातच सोशल मीडियावर एका तरूणीचा व्हिडिओ तूफान व्हायरल होतोय, ज्यात ती भररस्त्यावर वाहतुकीच्या गर्दीत बिनधास्त रीलसाठी डान्स करताना पाहायला मिळत आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

तरुणीचा हटके डान्स....

व्हायरल व्हिडिओत तुम्ही पाहू शकतो, भरदिवसा एका रस्त्यावर रिक्षा, बाईकची तसेच लोकांची वर्दळ दिसून येतेय. दरम्यान त्या रस्त्यावर सिग्नल लागतो. यामध्ये एक तरूणी रस्त्याच्यामधोमध येते आणि डान्स करण्यास सुरूवात करते. कहर तर तेव्हा होता जेव्हा तरूणी रस्त्याच्यामधोमध येऊन चक्क खाली झोपून डान्स करते. यात असे दिसते की ती रिल्स बनवण्याच्या नादात असा विचित्र डान्स करत आहे. तरूणीने फॅशनेबल टॉप आणि जीन्स परिधान केलेली आहे.

तरूणीचा व्हायरल व्हिडिओ एक्स प्लॅटफॉर्मच्या @desimojito या अकाऊंटवरून पोस्ट करण्यात आला आहे. तसेच कॅप्शनमध्ये लिहिल आहे की,इतना आत्मविश्वास'. परंतूहा व्हिडिओ कुठल्या ठिकाणाचा आहे हे समजू शकले नाही. आतापर्यंत तुम्ही बाजारात, मेट्रोमध्ये डान्स करणाऱ्यांचा व्हिडिओ पाहिला असेल. मात्र, वाहतुकीच्या ठिकाणी भर रस्त्यावर नाचणाऱ्या तरुणीचा व्हिडिओ आता व्हायरल होत आहे.

व्हायरल व्हिडिओला नेटकऱ्यांच्या भन्नाट प्रतिक्रिया आल्यात. कमेंट बॉक्समध्ये यूजर्संनी तरूणीला मोठ्या प्रमाणात ट्रोल केले आहे. एका यूजरने कमेंट केली आहे की,प्रत्येकजण लाईक्स आणि फॉलोअर्स वाढवण्यात व्यस्त आहे'. तर आणखी एका यूजरने लिहिल आहे की,पृथ्वी हादरली असती'. व्हिडिओला हजारोंच्या घरात व्ह्यूज आणि लाईक्स् मिळालेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Brain Cancer: मेंदूचा कॅन्सर होण्यापुर्वी डोकंच नाही तर ही गंभीर लक्षणं दिसतात, या समस्यांना दुर्लक्षिक करणं आत्ताच टाळा

Marathi Actress : ॲक्शन सीन करताना मालिकेच्या नायिकेला दुखापत; नाकावर पट्टी लावून करतेय शूटिंग, पाहा VIDEO

Secret Santa Gifts For Women: आला सिक्रेट सॅन्टाचा खेळ! ऑफिसमधील महिला सहकाऱ्यांसाठी घ्या 'या' 5 उपयोगी वस्तू

Shevgyachya Shenga Recipe : थंडीत बनवा झणझणीत सुक्का शेवगा शेंगाची भाजी, वाचा रेसिपी

Pune Politics: पुण्यात मोठी राजकीय उलथापालथ, रमेश वांजळेंची बायको अन् मुलगी तर बापू पठारेंच्या मुलगा भाजपात

SCROLL FOR NEXT