Kanpur Viral Video Saam Tv
व्हायरल न्यूज

Viral Video: शाळा आहे की डान्स बार? रात्रभर महिलांना नाचवलं, लहान मुलांसमोर अश्लिल हावभाव; VIDEO व्हायरल

Dance Viral Video: कानपूर देहातमधील सरकारी शाळेत बार डान्सर्सचा धिंगाणा! शाळेच्या मैदानावर बेकायदेशीर कार्यक्रम, लहान मुलांनीही पाहिला डान्स. प्रशासनाची तात्काळ कारवाई.

Manasvi Choudhary

उत्तरप्रदेशच्या कानपूर देहात शहरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. सरकारी शाळेत बार डान्सरने धिंगाणा घातला आहे. मुसानगर पोलिस स्टेशन जवळच्या परिसरातील सरकारी शाळेत रात्रभर बार डान्सर्स यांनी अश्लील डान्स केला आहे. या घटनेचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये गावातील काही नागरिंकाचा देखील डान्स करतानाचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.

स्थानिक रहिवासी गजराज सिंगने नातवाच्या छठी कार्यक्रमानिमित्त आयोजन केले होते. शाळेकडून कोणतीही परवानगी न घेता त्यांनी शाळेच्या मैदानात या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, की चित्रपटातील आयटम साँगवर नर्तिका नाचताना दिसत आहेत. शाळेतील खुर्च्या आणि मुलांच्या बसणाच्या जागांवर या नर्तिका नाचत आहेत. सर्वात धक्कादायक म्हणजे, लहान मुले देखील हा कार्यक्रम पाहताना दिसत आहेत.

सोशल मीडियावर हा व्हिडीओ व्हायरल होताच जिल्हा प्रशासन यांनी कारवाई केली आहे. या घटनेची माहिती घेत त्यांनी शाळेच्या मुख्याध्यापिकांना ताब्यात घेतले आहे. पोलिसांना या घटनेची माहिती मिळताच कारवाई केली आहे. या व्हायरल व्हिडीओवर नेटकऱ्यांनी देखील संताप व्यक्त केला आहे. मुलांची शिकण्याच्या शाळेतच जर असा प्रकार होत असेल तर मोठा प्रश्न निर्माण झाला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: आशिष शेलार यांच्या वोट जिहाद च्या मुद्द्याला मनसेकडून जोरदार उत्तर

QR Code : बनावट क्यूआर कोड कसा ओळखावा? जाणून घ्या

Chanakya Niti: सर्वात जास्त ज्यावर प्रेम करतो तोच घात करतो? चाणक्यांनी सांगितलं गुपित

Forest Department Recruitment: खुशखबर! वनविभागात नोकरीची सुवर्णसंधी; अर्ज कुठे अन् कसा करावा?

Moto G67 Power 5G Launched: अडीच बॅटरी बॅकअप, 4K व्हिडिओ रेकॉर्डिंग, ५० मेगापिक्सेल कॅमेरा; दमदार फीचरवाला Moto चा G67 Power 5G लाँच

SCROLL FOR NEXT