Uttar Pradesh Kanpur Viral Video Saam Tv
व्हायरल न्यूज

Viral Video : चपलेने मारलं, फावड्याने हल्ला केला; तरुणीचा विनयभंग करणाऱ्या तरुणाला चोपलं,Video व्हायरल

Uttar Pradesh Kanpur Viral Video : कानपूरमध्ये विनयभंगाच्या घटनेनंतर संतापलेल्या महिलांनी आरोपीला घरात घुसून चोप दिला. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून पोलिसांनी आरोपीविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

Alisha Khedekar

  • कानपूरमध्ये विनयभंग प्रकरण उघड

  • महिलांनी आरोपीला घरात घुसून मारहाण

  • घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल

  • पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले

उत्तर प्रदेशातील कानपूरमध्ये एका तरुणाने येणाऱ्या जाणाऱ्या महिलांचा विनयभंग आणि छेड काढल्याप्रकरणी घरात जाऊन चोप दिला. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे. यानंतर नागरिकांनी तरुणाला पोलिसांच्या ताब्यात दिले असून पोलीस ठाण्यात तरुणा विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस या प्रकरणी तपास करत आहेत.

दैनिक भास्करने दिलेल्या वृत्तानुसार , सदर घटना कानपुर शहरातील जारौली गावातील बिहारी पुरवा येथे घडली आहे. ९ मार्च रोजी दुपारी १:३० वाजता एक तरुणी कामासाठी घरातून बाहेर पडली असता शेजारी राहणाऱ्या तरुणाने तिचा विनयभंग केला. संतापलेली तरुणी तरुणाच्या अंगावर धावून केली.

काही क्षणातच तिथे आजूबाजूने नागरिक जमा झाले. इतर महिलांनी सुद्धा तरुणाच्या कृत्याबाबत तक्रार करत त्याच्या घरी जाऊन त्याला चोप दिला. यानंतर काही तरुणांनी महिलांना शांत करत आरोपीला पोलिसांच्या स्वाधीन केले. या घटनेचा व्हिडिओ देखील व्हायरल होत आहे.

व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये ५ ते ६ महिला संबंधित आरोपीला चोप देताना पाहायला मिळत आहे. एक महिलेने आरोपीला शिवीगाळ करत त्याला चपलेने मारलं तर दुसऱ्या महिलेने थेट फावडा आणून आरोपीवर हल्ला केला. तसेच इतर महिला त्याला हाताने हाणामारी करत होत्या. याप्रकरणी पोलीस ठाण्यात आरोपी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस या घटनेचा सखोल तपास करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update:धाराशिव जिल्ह्याला मुसळधार पावसाने झोडपलं

LPG Cylinder Price: एलपीजी सिलेंडर ६५८ रुपयांनी स्वस्त मिळतोय, १०.५८ कोटी कुटुंबांना ९५८ रुपयांचा बंपर फायदा, पाहा नेमकं गणित

Weekly Horoscope: या राशींनी खर्चावर नियंत्रण ठेवणं गरजेचं; वाचा तुमचं साप्ताहिक राशीभविष्य

भल्या पहाटे ८.२ तीव्रतेच्या भूकंपाने जमीन हादरली, 'या' देशाला त्सुनामीचा इशारा

Period changes with age: २०, ३० आणि ४० नंतर मासिक पाळीच्या फ्लो होतो बदल, डॉक्टरांनी सांगितली प्रत्येक वयोगटातील महत्त्वाची कारणं

SCROLL FOR NEXT