Viral Video Saam Tv
व्हायरल न्यूज

Viral Video: तुफान टॅलेंट! ढोलकीचा आवाज अन् काकांचा जबरदस्त ठेका; स्टेप्स पाहून नेटकरीही दंग

Uncle Dance Viral Video: सोशल मीडियावर लग्नातील व्हिडिओ जोरदार व्हायरल होत आहे.ज्यामध्ये एका काकांनी ढोलकीच्या तालावर जोरदार डान्स केलेला आहे.व्हिडिओ पाहून प्रत्येकजण थक्क झालेले आहेत.

Tanvi Pol

Trending Dance Video: सोशल मीडियावर कायम विविध व्हिडिओ पाहण्यासाठी मिळत असतात.कधी स्टंटबाजीचे व्हायरल व्हिडिओ असतात तर कधी पोट धरुन हसायला लावणारे व्हिडिओ असतात.त्यातच सध्या एका काकांचा डान्स व्हिडिओ जोरदार व्हायरल होत आहे.

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओत तुम्हाला एक कार्यक्रम सुरु असलेला दिसत आहे.या कार्यक्रमानिमित्ताने काही तरुण डान्स करत असतात तेव्हाच तिथे एक काका येतात आणि ढोलकी वाजत असलेल्या तालावर डान्स(Dance) करण्यास सुरुवात करतात.काका असा डान्स करतात की पाहणारे पाहतच राहातात.सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झालेला आहे.

'dr_rais_meer_official' या अकाउंटवर व्हिडिओ अपोलड करण्यात आलेला असून आतापर्यंत व्हिडिओला एक लाखाहून अधिकचे लाईक्स आणि मोठ्या संख्येने व्ह्यूज मिळत आहेत शिवाय इन्स्टाग्रामवरच नाही तर अन्य सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर व्हिडिओ शेअर करण्यात येत आहे.

काकांचा डान्स पाहिल्यानंतर सोशल मीडियावर फक्त या व्हिडिओची (Video)चर्चा सुरु आहे.एवढेच नाही तर नेटकऱ्यांनी अनेक प्रतिक्रियाही केलेल्या आहेत.त्यातील एका यूजरने कमेंट केली आहे,''आम्हाला वाटते की तो लहानपणी एक विनोदी कलाकार होता'' तर दुसऱ्या एका यूजरने कमेंट केली आहे,''काका कडक डान्स केलात'',तर काहींनी मजेशीर प्रतिक्रिया केलेल्या आहेत.

टीप: काकांचा हा डान्स व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याची पडताळणी झालेली नाही. फक्त माहिती म्हणून आम्ही वाचक-प्रेक्षकांपर्यंत ही बाब पोहचवत आहोत. याचं आम्ही कोणत्याही प्रकारे समर्थन करत नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी मनसेकडून आजपासून सह्यांची मोहीम

Soaked Walnut Vs Dry Walnuts: भिजवलेले की सुके, मेंदूच्या आरोग्यासाठी कोणते अक्रोड बेस्ट?

Palak Paratha Recipe: नाश्त्यासाठी बनवा हेल्दी, पौष्टिक आणि चविष्ट पालक पराठा, वाचा सोपी रेसिपी

Congress Protest Live Update : राहुल गांधींच्या नेतृत्वात इंडिया आघाडीचा थेट सर्वोच्च न्यायालयापर्यंत मेगा मोर्चा; दिल्लीत हायव्होल्टेज ड्रामा

ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींच्या खात्यात ₹३,००० रुपये जमा होणार? मोठी अपडेट समोर; २,१00 रुपयांवर सरकारचे स्पष्टीकरण

SCROLL FOR NEXT