Women Viral Video Saam TV
व्हायरल न्यूज

Women Viral Video : रेल्वेत टीसीने विचारलं तिकीट कुठेय? महिलेच्या उत्तराने मन जिंकलं

Railway Viral Video : महिलेसोबत ती शेळ्या आणखी एक व्यक्तीही होती.

प्रविण वाकचौरे

Viral Video :

रेल्वेतून विनातिकीट प्रवास करणाऱ्या फुकट्यांची संख्या मोठी आहेत. विनातिकीट प्रवास करणाऱ्यांकडून रेल्वे दरवर्षी कोट्यवधीची दंडवसुली करते. एकीकडे ही स्थिती असताना रेल्वेतील एका महिला प्रवाशाचा एक व्हिडीओ समोर आला आहे. तो व्हिडीओ पाहून रेल्वे प्रशासनालाही मनोमनी वाटेल की सगळे प्रवासी असेच असावेत.

ट्रेनमधून प्रवास करणाऱ्या प्रामाणिक महिलेचा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. झालं असं की, व्हिडीओत दिसणारा महिला आपल्या तीन शेळ्यांसह ट्रेनमधून प्रवास करत होती. तेव्हा तिथे पोहोचलेल्या टीटीईने तिच्याकडे तिकीट कुठे आहे? अशी विचारणा केली. यावर महिलेने दिलेल्या उत्तराने सर्वांचच मन जिंकलं. (Viral VIdeo)

महिलेसोबत ती शेळ्या आणखी एक व्यक्तीही होती. टीटीईने तिकीट विचारणा केल्यानंतर महिलेने तिन्ही बकऱ्यांसाठीही तिकिटे काढल्याची माहिती दिली. तसेच तिने टीटीईला काढलेलं तिकीटही दाखवलं. महिलेचा प्रामाणिकपणा पाहून टीटीईच्या चेहऱ्यांवर स्मितहास्य फुललं.

अवघ्या 22 सेकंदाचा हा  व्हिडीओ ट्विटरवर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. डी प्रशांत नायर यांनी हा व्हिडीओ शेअर केला आहे. हा व्हिडीओ आतापर्यंत 16 लाखांहून अधिक वेळा पाहिला गेला आहे. तर लोक प्रचंड लाईक्स आणि कमेंटही करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: पुणेकरांवर पाणी कपातीची टांगती तलवार?

LPG Rate : ९१३ रुपयांचा गॅस सिलिंडर थेट ५८७ रुपयांना! तुम्हाला मिळणार का फायदा? पाहा नियम

Pune : पुण्यात भयंकर घडलं! आईने पोटच्या २ मुलांसह विहिरीत उडी मारून संपवलं जीवन; धक्कादायक कारण समोर

विमानतळावर रिल्स आणि फोटो काढण्यावर बंदी! नियम मोडल्यास मोबाईल जप्त होणार

Cancer patient mental health: धक्कादायक वास्तव! अर्ध्याहून अधिक कॅन्सरग्रस्त रूग्ण तणावाखाली, नव्या रिसर्चने चिंता वाढवली

SCROLL FOR NEXT