काळी बुरशीचा कांदा खात असाल तर सावधगिरी बाळगा असा दावा करणारा मेसेज व्हायरल करण्यात आलाय...ब्लॅक फंगस म्हणजे काळी बुरशी असलेला कांदा जीवघेणा ठरू शकतो असा दावा केल्याने खळबळ उडालीय...मात्र, या दाव्यात तथ्य आहे का...? राज्यात हजारो कांदा शेतकरी आहेत आणि कांदा प्रत्येकजण जेवणात वापरतो...त्यामुळे याची सत्यता जाणून घेण्यासाठी आमच्या टीमने पडताळणी सुरू केली..
कांद्यावरील काळी बुरशी जीवघेणी ठरू शकते.युपीतील एका महिलेला काळ्या बुरशीचा कांदा खाणं महागात पडलंय. यामुळे उलट्या, जुलाब होऊ शकतात...याबाबत एक्सपर्ट माहिती देऊ शकतात...त्यामुळे आमचे प्रतिनिधी एक्सपर्टला भेटले.. कांद्यावरील ब्लॅक फंगस हा जीवघेणा नाही असं मत तज्ज्ञांचं आहे...तरीदेखील असा काळ्या फंगसवाला कांदा खाल्ल्याने आरोग्यावर काय परिणाम होतो का हे डॉक्टरांकडून जाणून घेतलं...
कांदा शिजवल्यास ब्लॅक फंगस मरून जातो
ब्लॅक फंगसचा कच्चा कांदा खाल्ल्यास बाधा होण्याची शक्यता
प्रतिकारशक्ती कमी असल्यास उलट्या, जुलाब, डायरिया होऊ शकतो
कुठल्याही प्रकारची बुरशी पोटात गेल्यास त्रास होतो
कांद्यावरील काळी बुरशी जीवघेणी नाही
काळी बुरशी असल्यास कांदा स्वच्छ धुऊन वापरा
ही काळी बुरशी घातक नाही, मात्र कांद्याची गुणवत्ता खालावते...साठवलेल्या कांद्यावर हमखास ही बुरशी दिसून येते...त्यामुळे कांदा स्वच्छ धुऊन तो वापरला तर त्याचा काहीही दुष्परिणाम होत नसल्याचं तज्ज्ञांचं मत आहे...त्यामुळे आमच्या पडताळणीत कांद्यावरील बुरशी जीवघेणी ठरू शकते हा दावा असत्य ठरलाय.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.