Anmol, the ₹23 crore Murrah bull from Haryana’s Sirsa district, alive and healthy despite viral death rumours. Saam Tv
व्हायरल न्यूज

₹23 Crore Bull Not Dead: 23 कोटींच्या 'अनमोल'चा मृत्यू? हट्टाकट्टा रेड्याला अचानक काय झालं?

Fact check: 23 कोटींच्या अनमोल रेड्याचा मृत्यू झालाय...हे ऐकूनच तुम्हाला धक्का बसला असेल...पण, होय या रेड्याचा मृत्यू झाल्याचा दावा करण्यात आलाय...हट्टाकट्टा असलेल्या रेड्याला अचानक काय झालं...याची आम्ही पडताळणी केली...

Sandeep Chavan

काही दिवसांपूर्वी पुष्कर मेळ्यात आलेल्या 23 कोटींच्या रेड्याचा मृत्यू झाल्याचा करण्यात आलाय...रेडा मेल्याचा दावा करणारा हा व्हिडिओ समोर आल्याने एकच खळबळ उडालीय...23 कोटी म्हणजे ही किंमत छोटी नाही...आणि एवढ्या मोठ्या किंमतीचा रेडा मेला तर मालकाला किती नुकसान झालं असेल...

याचा विचारही न केलेला बरा...मात्र, हा व्हिडिओ आता समोर आल्याने देशभरात हळहळ व्यक्त केली जातेय...पण, खरंच अनमोल रेडा मेलाय का...? याची माहिती मिळवण्याचा आम्ही प्रयत्न केला...

वाकडी शिंगं...वजन 1500 किलो...खायला बदाम, प्यायला दूध...या रेड्याचा रुबाब म्हणजे राजावानी होता...पण, पुष्कर मेळ्यात सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलेल्या या रेड्याला अचानक काय झालं...? 23 कोटींच्या रेड्याला असा काय झालं की त्याचा मृत्यू झाला...? निपचित पडलेल्या या रेड्याचा व्हिडिओ वाऱ्याच्या वेगानं पसरलाय...रेड्याच्या तोंडातूनही फेस येतोय...त्यामुळे काहींनी खरंच रेड्याचा मृत्यू झाल्याचा दावा केलाय...त्यामुळे आम्ही याची पडताळणी सुरू केली...याची माहिती मिळवण्यासाठी आम्ही पडताळणी सुरू केली...याबाबत माहिती मिळवताना आम्हाला काही माहिती हाती लागली...त्यावेळी आमच्या पडताळणीत काय सत्य समोर आलं पाहुयात..

23 कोटींचा अनमोल रेडा मेलेला नाही

रेडा आराम करतानाचा व्हिडीओ पोस्ट केलाय

आराम करतानाचा व्हिडिओ व्हायरल करून चुकीचा दावा

23 कोटींचा अनमोल रेडा मेला ही अफवाच होती...

पुष्कर मेळ्यातील या रेड्याला काहीही झालेलं नाही. रेडा अगदी ठणठणीत आहे...या रेड्याचा खुराकही अगदी राजासारखा आहे...अनमोलच्या खुराकावरही एक नजर टाकूयात...

अनमोलचा खुराक कसा आहे?

रोज 250 ग्रॅम बदाम

4 किलो डाळिंब

अडीच डझन केळी

5 लिटर दूध, 20 अंडी

तूप, सोयाबीन, मका

हिरवा चारा

रोज तेलाने मालिश

मुर्रा जातीचा अनमोल रेडा हा हरियाणामधील सिरसा जिल्ह्यातील आहे...त्याचं वजन 1500 किलो इतकं आहे...दिवसाला दीड ते 2 हजारांचा खर्च येतो...मात्र, 23 कोटींच्या अनमोल रेड्याचा मृत्यू झाल्याची अफवा आहे....त्यामुळे त्याचा मृत्यू झाल्याचा दावा आमच्या पडताळणीत असत्य ठरलाय...

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Fact Check : आता पाईपलाईननं दारू मिळणार? सरकारकडे अर्ज केल्यानंतर कनेक्शन?

Smriti Mandhana: स्मृती मानधना-पलाशचं लग्न का पुढे ढकललं? कधी होणार लगीन? मुच्छलच्या बहिणीचा मोठा खुलासा

बिबट्या आला रे...! आधी गावात दहशत, आता पुणे शहरात एन्ट्री, VIDEO

धनंजय मुंडेंना 'कराड'ची ओढ? कराडच्या आठवणीनं मुंडे व्याकूळ, VIDEO

Ethiopia volcano : इथियोपियात १०००० वर्षांनंतर ज्वालामुखीचा उद्रेक; आकाशात १०-१५ किमी उंच उडाले राखेचे कण, भारतावर संकट?

SCROLL FOR NEXT