Zomato Delivery Boy With Her Baby Girl Viral Video Saamtv
व्हायरल न्यूज

Zomato Boy Viral Video: आभाळाएवढा बापमाणूस! लेकीला पोटाशी बांधून करतोय संघर्ष; व्हिडिओने मीडिया जगत भावूक

Zomato Delivery Boy With Her Baby Girl Viral Video: नेटकऱ्यांनी मुलीसाठी कष्ट करणाऱ्या या बापाचे तोंड भरुन कौतुक करत त्याच्यासाठी मदतीचा हातही पुढे केला आहे.

Gangappa Pujari

Father Daughter Viral Video: आई वडिलांच आपल्या मुला बाळांवर जितकं प्रेम असत, ज्याची सर दुसऱ्या कोणत्याही नात्याला येत नाही. खास करुन वडिलांचे आपल्या मुलीवर असलेले प्रेम जबरदस्तच. लहानपणी बोट धरायला चालायला शिकवण्यापासून ते मोठेपणी प्रत्येक गोष्टीत काळजी करणारे बाप- लेकीचे नाते ग्रेटच असते.

परिस्थिती कशीही असली तरी आपले आई- वडिल आपल्या मुलांसाठी रात्रंदिवस कष्ट करून सुखाचा घास भरवत असतात. सध्या सोशल मीडियावर अशाच एका व्हायरल व्हिडिओने सर्वांचे लक्ष वेधले आहे. ज्यामधील डिलीवरी बॉयच्या संघर्षाने मीडिया जगत भावूक झाले आहे. काय आहे हे व्हायरल व्हिडिओची कथा, चला जाणून घेवू.. (Father Daughter Emotional Video)

काय आहे व्हिडिओ...

सोशल मीडियावर (Social media) आपल्याला अनेक व्हायरल व्हिडिओ पाहायला मिळतात. ज्यामधील काही व्हिडिओ आपल्याला आश्चर्याचा धक्का देतात तर काही व्हिडिओ भावूक करुन जातात. अनेकांच्या संघर्षाची कथाही अशाच व्हायरल व्हिडिओंमधून जगासमोर उलघडत असते. सध्या अशाच एका ह्रदयस्पर्शी व्हिडिओने नेटकऱ्यांना भावूक केले आहे.

हा व्हायरल व्हिडिओ (viral Video) एका झोमॅटो डिलीव्हरी बॉयचा असून तो आपल्या लहान लेकीला पोटाशी बांधून ऑर्डर देताना दिसत आहे. त्याच्यासोबत त्याचा एक मुलगाही आहे. हा संपूर्ण प्रकार पाहून ऑर्डर घेणारा तरुणही चांगलाच भावूक झाल्याचे दिसत आहे.

बाप- लेकीच प्रेम...

सोशल मीडियावर ट्रेंडिग(Trending Viral Video) असलेल्या या व्हिडिओमध्ये एक झोमॅटो डिलिव्हरी बॉय ऑर्डर घेवून दारात आल्याचे दिसत आहे. जेव्हा ऑर्डर घेण्यासाठी तरुण घराबाहेर येतो तेव्हा तो अवाक होतो. कारण हा डिलिव्हरी बॉय कुशीत त्याच्या लहान मुलीला घेवून आला होता.

तसेच त्याच्यासोबत त्याचा एक लहान मुलगाही असल्याचे दिसत आहे. ऑर्डर घेणारा तरुण त्याला दोन्ही मुलांबद्दल विचारतो. तेव्हा तो दोन्ही मुली त्याचीच असून त्यांना घेवूनच तो काम करत असल्याचे सांगतो. त्याच्या या उत्तराने ऑर्डर घेणारा तरुणही भावूक होवून चांगलाच भावूक होतो.

नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया....

हा व्हिडिओ foodclubbysaurabhpa या फूड ब्लॉगरने (Food bloger) आपल्या पेजवर पोस्ट केला आहे. ज्यावर नेटकऱ्यांनी भरभरुन प्रतिक्रिया दिल्या आहेत. अनेकांनी बाप- लेकीचा हा व्हायरल व्हिडिओ प्रेरणादायी असल्याचे म्हणले आहे.

तर काही जणांनी मुलीसाठी कष्ट करणाऱ्या तिच्या वडिलांचे तोंड भरुन कौतुक करत त्याच्यासाठी मदतीचा हातही पुढे केला आहे. आत्तापर्यंत हा व्हिडिओ लाखो लोकांनी पाहिला असून तो जोरदार व्हायरल होत आहे. (Latest Marathi News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Dry Fruits: पावसाळ्यात ड्राय फ्रुट्स साठवण्यासाठी वापरा 'या' सिंपल टिप्स

Sunday Horoscope : आषाढी एकादशीला होणार विष्णूची कृपा; 'या' राशींच्या लोकांवर धनाचा वर्षाव होणार

Ind vs Eng Live, 2nd Test: अबब! इंग्लंडच्या संघासमोर ६०० पेक्षा जास्त धावांचं आव्हान; टीम इंडियाकडून डाव घोषित

एकत्र आलो एकत्र राहण्यासाठी; गर्दी मराठी भाषेवरच्या अन्यायाविरोधातील, वरळीतल्या ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याची

8 Hour Sleep: शरीराला ८ तासाच्या झोपेची आवश्यकता का आहे? वाचा महत्वाचे कारण

SCROLL FOR NEXT