Shocking Incident: सोशल मीडिया युगात नुकताच एक धक्कादायक व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे. ज्या व्हिडिओमध्ये एक पत्नी आपल्या पतीला घराच्या बाहेर चोप देताना दिसत आहे. हा व्हिडिओ पाहून नेटकरी अक्षरशः आश्चर्यचकित झाले असून, त्यांच्या प्रतिक्रिया वेगवेगळ्या दिसत आहेत.
व्हायरल (Viral) होत असलेल्या व्हिडिओत तुम्हाला, घराच्या बाहेर काही कुटुंबियांचा मोठा गोंधळ उडाला आहे. मात्र, या घटनेत एक महिला तिच्या पतीला जोरदार मारताना दिसत आहे आणि घरातील इतर सदस्य महिलेची अडवणूक करताना दिसून येत आहेत. सर्व घटना परिसरातील अन्य शेजाऱ्यांनी मोबाईलमध्ये कैद केली आणि सोशल मीडियावरही शेअर केली आहे.
हा व्हिडिओ सध्या इन्स्टाग्रामवरील statemirrornews या अकाउंटवर अपलोड करण्यात आलेला असून तो फेसबूक आणि अन्य माध्यमांवरही शेअर करण्यात आलेला आहे. व्हिडिओ अपलोड केल्यानंतर कॅप्शनमध्ये घडलेल्या घटनेचे कारण देण्यात आलेले आहे. आतापर्यंत या व्हिडिओला लाखोंचे लाईक्स आणि हजारो व्ह्यूज मिळालेले आहेत.
सध्या ही घटना इंटरनेटवर चर्चेचा विषय बनली आहे शिवाय लोकांनी विविध प्रतिक्रिया केलेल्या आहेत. त्यातील एका यूजरने म्हटलं आहे,''कलियुग आले आहे'' तर दुसऱ्या यूजरने कमेंट केली,''नक्कीच नवऱ्याने (Husband) असं काही केलं की ऐवढा मार खाल्ला'' अशा अनेक मजेशीर तर काहींनी आश्चर्यकारक प्रतिक्रिया केलेल्या आहेत.
टीप: हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याची पडताळणी झालेली नाही. फक्त माहिती म्हणून आम्ही वाचक-प्रेक्षकांपर्यंत ही बाब पोहचवत आहोत. याचं आम्ही कोणत्याही प्रकारे समर्थन करत नाही.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.