Viral Video Saam Tv
व्हायरल न्यूज

Viral Video: एक्सप्रेस ट्रेनमध्ये सापाची एन्ट्री; एसी बोगीतील प्रसंग पाहून प्रवाशांनी घातला गोंधळ

Snake Shocking Video: रेल्वे प्रवास करत असताना अनेकदा धक्कादायक गोष्टी घडत असतात. सध्या अशीच एक घटना सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. नक्की काय घडले असेल ते व्हिडिओत पाहा.

Tanvi Pol

Train Viral Video: रेल्वेमधील एसी कोचचा प्रवास सुखाचा आणि आरामदायी असतो. मात्र, कल्पना करा, तुम्ही एसी कोचमधून निवांत प्रवास करत असताना अचानक समोर भलामोठा साप दिसला तर? अशीच अंगाचा थरकाप उडवणारी घटना नुकतीच एका रेल्वे प्रवासादरम्यान घडली. घडलेल्या या घटनेने संपूर्ण डब्यात प्रवाशांचा गोंधळ उडाला होता.

रेल्वे प्रवासात अचानक आलेलं संकट

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओत तुम्हाला रेल्वेत प्रवाशांमध्ये तुफान गोंधळ सुरु असलेला दिसत आहे आणि संपूर्ण प्रवाशी सीटच्या वर सामान ठेवण्याच्या रॅककडे पाहत ओरडत असतात. तुम्हीही सीटच्या वर असलेल्या रॅककडे पाहिले तर तुम्हाला तेथू एक साप असलेला दिसून येईल आणि त्या सापाचे (Snake)तोंड प्रवाशांच्या सीटच्या दिशेने आहे. त्यातील काही प्रवासी सापाच्या जवळ जाऊन व्हिडिओ मोबाईलमध्ये कैद करत आहेत.

प्रवाशांमध्ये भीतीचं वातावरण

संपूर्ण धक्कादायक घटना जनशताब्दी एक्सप्रेसमधील असल्याचे समजते. मात्र, साम टीव्ही याबाबत पुष्टी करत नाही. सोशल मीडियावर हा व्हिडिओ वाऱ्याच्या वेगाने व्हायरल झाला आणि काही दिवसात या व्हिडिओला लोकांनी हजारो लाईक्स आणि व्ह्यूज मिळवून दिलेले आहेत. शिवाय हा व्हिडिओ फेसबूक आणि अन्य सोशल माध्यांवरही शेअर करण्यात आलेला आहे.

हा व्हिडिओ (Video) इन्स्टाग्रामवरील virat24news या अकाउंटवर अपलोड करण्यात आलेला आहे. व्हिडिओ व्हायरल होताच लोकांनी त्यावर अनेक प्रतिक्रियाही केलेल्या आहेत. त्यातील एका यूजरने कमेंट केली,'' असे वारंवार प्रकार पाहण्यासाठी मिळत आहेत'' तर दुसऱ्या यूजरने कमेंट केली,''प्रवास करायचा की नाही आता'' शिवाय काही यूजर्संनी रेल्वे प्रशासनाविरोद्धात संताप व्यक्त केलेला आहे.

टीप: ट्रेनमधील हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याची पडताळणी झालेली नाही. फक्त माहिती म्हणून आम्ही वाचक-प्रेक्षकांपर्यंत ही बाब पोहचवत आहोत. याचं आम्ही कोणत्याही प्रकारे समर्थन करत नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi bhasha Vijay Live Updates : तोडा-फोडा राज्य करा, ही यांची निती - ठाकरे

Spiritual Shells: पैशाचा पाऊस पाडणारी कौरीची शेल कशी तयार होते? याचे महत्त्व काय आहे?

Dhule Tourism : वीकेंडसाठी धुळे परफेक्ट लोकेशन, 'ही' ३ ठिकाणं पाहताच आठवड्याचा थकवा जाईल पळून

Maharashtra Live News Update: विठ्ठल रुक्मिणी मंदिर फुलांनी सजले

Metro In Dino Cast Fees: रोमँटिक म्युझिकल ड्रामा 'मेट्रो इन डिनो' चित्रपटातील कलाकारांचे मानधन किती?

SCROLL FOR NEXT