Viral Video Saam Tv
व्हायरल न्यूज

Viral Video: व्हायरलसाठी काहीही! तरुण थेट हायवेच्या होर्डिंगवर चढला अन्....Video पाहून नेटकऱ्यांचा संताप अनावर

Dangerous Stunt Video: सोशल मीडियावर सध्या एका तरुणाचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. जो व्हिडिओ पाहिल्यानंतर मनात धडकीही बसते आणि संतापही अनावर होतो.नक्की काय घडते ते एकदा पाहा.

Tanvi Pol

Youth Shocking Stunt: आजचा काळ हा रील्सचा आहे.दरदिवशी सोशल मीडियावर लाखोंच्या संख्येने नागरिक रील्स बनवत असतात.मात्र सध्या व्हायरल होत असलेला व्हिडिओ बनवण्यासाठी पुर्ण हद्द पार केलेली दिसत आहे.नक्की काय घडले असेल ते एकदा पाहा.

सोशल मीडियावरुन तुम्ही पाहिले असेल रातो-रात अनेक व्यक्ती प्रसिद्ध झाले.त्यामुळे सध्याच्या तरुणाई प्रकाशझोतात येण्यासाठी धोकादायक स्टंट (Stunt)करायला तयार होतात.मग अनेकदा जीव गमावून बसतात.सध्याचा व्हायरल होत असलेला व्हिडिओही काहीसा असाच आहे.ज्यामध्ये एका तरुणाने आपल्या जीवाचीही पर्वा न करता हायवेरील साइनबोर्डवर चढला आहे.

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओत तुम्हाला एक हायवेवर असलेला साइनबोर्ड दिसत आहे.जर नीट पाहिले तर उंच असलेल्या अशा साइनबोर्ड एक तरुण चढलेला दिसत आहे.ज्या वेळेस तरुण साइनबोर्ड पूर्णपणे उभा राहतो तेव्हा खाली असलेले त्याचे काही मित्र त्याला हात करत आनंद साजरा करताना दिसत आहे.जर तरुणाचा जराही तोल गेला असता तो धाडकन रस्त्यावर पडला गेला असता आणि त्यात जीवही त्याला गमवावा लागला असता.

व्हायरल होत असलेला हा व्हिडिओ उत्तर प्रदेश(UP) मधील असल्याचे समजते.सर्व धक्कादायक व्हिडिओ एक्स प्लॅटफॉर्मवरील Bharat Samacha या अकाउंटवर अपलोड करण्यात आलेला आहे. व्हिडिओ व्हायरल होताच नेटकरी वर्गातून संताप व्यक्त केला जात असून प्रत्येक नेटकरी वर्गाने व्हिडिओच्या कमेंटमध्ये तरुणांना चांगलाच पोलिसांना समज दिला पाहिजे असे लिहिले आहे.

टीप : हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याची पडताळणी झालेली नाही. फक्त माहिती म्हणून आम्ही वाचक-प्रेक्षकांपर्यंत ही बाब पोहचवत आहोत. याचं आम्ही कोणत्याही प्रकारे समर्थन करत नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Tulsi Plant Vastu: सुकलेली तुळस काय संकेत देते? घरातील झाडे सुकण्याचा अर्थ काय?

DA Hike : कर्मचाऱ्यांची दिवाळीत चांदी! पगार वाढणार, 'या' राज्यात DA मध्ये थेट 8% वाढ

Gold Rate Today: गणेशोत्सवात सोन्याचे दर पुन्हा घरसले, आज सोनं खरेदीची सुवर्णसंधी; 18k- 22k आणि 24k चे दर किती?

Sonam Maskar: कोल्हापूरच्या लेकीचा देशासाठी ‘अचूक निशाणा’; सोनमने आशियाई नेमबाजीत पटकावलं रौप्यपदक, वडिलांच्या संघर्षाचंही झालं चीज

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी, या आठवड्यात खात्यात जमा होणार ₹1500

SCROLL FOR NEXT