Viral Video Saam Tv
व्हायरल न्यूज

Viral Video: बायकोशी भांडायला गेला अन् धाडकन जमिनीवर आपटला, नवऱ्याची फजिती कॅमेऱ्यात कैद

Husband Wife Argument: नवरा- बायकोमध्ये वाद होणं स्वाभाविक आहे. मात्र, अनेकदा साधारण वाटणारे भांडण कधी वेगळ्याच रुपात रुपातंरित होतात हे कळत नाही. सध्या व्हायरल होत असलेला व्हिडिओ असाच काहीसा आहे.

Tanvi Pol

Shocking Incident: नवरा-बायकोचं भांडणं सगळ्यांच्याच घरी होतं, पण काहींचं भांडण लोकांच्या मनोरंजनाचा भाग बनतं. सध्या असंच काहीसं घडलं आहे. जिथे एक पती तावातावात बायकोशी भांडण करण्यासाठी घराच्या छतावर जातो. मात्र, नशिबाने त्याची भलतीच मजा उडवली आहे. नक्की काय घडले असले ते व्हायरल होत असलेल्या व्हिडिओत पाहा.

बायकोशी भांडायला गेला अन्...

या घटनेत तुम्हाला, एका घराच्या छतावर महिला उभी असलेली दिसत आहे. त्यानंतर बायकोशी भांडण करण्यासाठी तिचा नवराही जातो आणि तिच्याशी वाद घालण्यासाठी सुरुवात करतो. हद्द तर तेव्हा होते जेव्हा तो व्यक्ती महिलेला मारण्यास सुरुवात करतो. पण महिलाही त्याला चोक प्रतिउत्तर देते आणि याच गडबडीत तो व्यक्ती घराच्या छतावरुन जमिनीवर जोरदार आपटला जातो. मात्र, यामध्ये त्याला दुखापत झालेली नाही असे व्हिडिओत दिसते.

नेटकऱ्यांच्या भन्नाट प्रतिक्रिया

व्हिडिओतीमधील हा प्रकार पाहिल्यानंतर प्रत्येक व्यक्ती बायकोला मारण्याचा हा परिणाम असे म्हणत आहे. तर एका व्यक्तीने व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट केली,''असंच पाहीजे'' तर दुसऱ्या यूजरने कमेंट केली,''गरज आहे का छतावर जाऊन वाद घालण्याची'' शिवाय तिसऱ्या यूजरने कमेंट केली,''सोशल मीडियावर काहीही व्हायरल होत'' तर काहींनी मजेशीर प्रतिक्रिया केलेल्या आहेत.

हा व्हिडिओ (Video) सध्या एक्सवरील @rareindianclips या अकाउंटवर अपलोड करण्यात आलेला आहे. व्हिडिओ पाहिल्यानंतर लोकांनी हजारो लाईक्स दिलेले आहेत शिवाय लाखोंच्या घरात याला व्ह्यूज मिळत आहेत. ऐवढेच नाही तर एक्स, फेसबूक आणि अन्य सोशल मीडिया माध्यमांवर शेअर करण्यात आलेला आहे.

टीप : हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याची पडताळणी झालेली नाही. फक्त माहिती म्हणून आम्ही वाचक-प्रेक्षकांपर्यंत ही बाब पोहचवत आहोत. याचं आम्ही कोणत्याही प्रकारे समर्थन करत नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Horoscope Sunday: कष्टाला पर्याय नाही, ५ राशींसाठी आजचा दिवस महत्वाचा असणार, वाचा रविवारचे राशीभविष्य

Saam Maha Exit Poll: शिर्डी नगरपालिकेत कुणाची सत्ता येणार? संभाव्य नगराध्यक्ष कोण? पाहा Exit Poll

कोल्हापुरात दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला, कुणाच्या गळ्यात पडणार नगराध्यक्षपदाची माळ? VIDEO

Instant Idli Recipe : पीठ न आंबवता १० मिनिटांत बनवा मऊ-लुसलुशीत इडली, वाचा इन्स्टंट रेसिपी

स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकीत भाजपचा डंका? कोणाचे किती नगरसेवक निवडून येणार?

SCROLL FOR NEXT