Viral Video Saam Tv
व्हायरल न्यूज

Viral Video: धडाकेबाज मराठा अंदाज! 'छावा' पाहायला घोड्यावरून आला पठ्ठ्या, लूकने वेधलं लक्ष

Viral Video News: सोशल मीडियावर सध्या एक धम्माकेदार व्हिडिओ व्हायरल होत आहे.व्हिडिओ पाहिल्यानंतर नेटकऱ्यांनी तरुणांचे कौतुक केलेले आहे.नक्की असे काय घडले ते पाहण्यासाठी व्हिडिओ पाहा.

Tanvi Pol

Grand Entry On Horse: छत्रपती संभाजी महाराज यांच्यावर जीवनावर आधारित छावा चित्रपट आज देशभरातील सिनेमागृहात प्रदर्शित झालाय.नागपुरच्या पंचशील सिनेमा गृहात छावा हा सिनेमा पाहण्यासाठी चक्क संभाजी महाराजांची वेशभूषा साकारून घोड्यावर वाजगाजा करत एक तरुण पोहचलाय.सध्या सोशल मीडियावर तरुणाच्या हटके एन्ट्रीचा व्हिडिओ जोरदार व्हायरल होत आहे.

सोशल मीडियावर दरदिवशी अनेक हटके व्हिडिओ पाहण्यासाठी मिळत असतात.त्यात बऱ्याचदा कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी कॉलेजमध्ये घेतलेल्या हटके एन्ट्रीचे व्हिडिओ असतात,सध्या असाच काहीसा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे,मात्र तो कोणत्या कॉलेजच्या विद्यार्थ्यांचा नाही तर छावा चित्रपट(Movie) पाहण्यासाठी एका तरुणाने घोड्यावर स्वार होत एन्ट्री मारली आहे.

विकी कौशलचा बहुप्रतिक्षित ऐतिहासिक चित्रपट 'छावा'ने बॉक्स ऑफिसवर दमदार सुरुवात केली आहे. विकी कौशल छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका साकारत आहे. तर रश्मिका मंदान्ना त्यांची पत्नी येसूबाईंची भूमिका साकारत आहे. गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर या चित्रपटासंबंधित नेटकऱ्यांनी अनेक व्हिडिओ व्हायरल केलेले आहेत.

तरुणाचा हा व्हिडिओ(Video) सध्या इन्स्टाग्राम या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर सध्या पाहता येत आहे शिवाय चित्रपटाच्या ट्रेलरवरून बराच वाद निर्माण झाला होता. अखेर आज हा चित्रपट सिनेमा गृहात रिलीज झाला आहे. चित्रपट पाहण्याचा मोठा उत्साह प्रेक्षकांमध्ये दिसून येत आहे.यावेळी त्या तरुणांचा स्वागत करण्यात आलं..

टीप : हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याची पडताळणी झालेली नाही. फक्त माहिती म्हणून आम्ही वाचक-प्रेक्षकांपर्यंत ही बाब पोहचवत आहोत. याचं आम्ही कोणत्याही प्रकारे समर्थन करत नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shocking : तोंडात कापडाचा बोळा कोंबला, हात-पाय रश्शीने बांधले; मुलाने आईला क्रूरपणे संपवलं, धक्कादायक कारण आलं समोर

Maharashtra Politics: भाजप मारणार एका दगडात दोन पक्षी? अजित दादांच्या गडाला भाजपचा सुरुंग

मुख्यमंत्र्यांच्या आईवर बोललो नाही, तू पंतप्रधानांच्या आईवर काय बोलला, दाखवू का? मनोज जरांगेंचं धनंजय मुंडेंना ओपन चॅलेंज

OBC Protest: एल्गार मोर्चाआधीच भुजबळांना धक्का?मोर्चाआधीच ओबीसी नेत्यांमध्ये फूट

Laxman Hake: ओबीसींसाठी आरक्षण संपलं! भुजबळांच्या मेळाव्याआधीच हाकेंचा एल्गार

SCROLL FOR NEXT