Viral Video Saam Tv
व्हायरल न्यूज

Viral Video: मोबाईलच्या नादात जीवाशी खेळ! रेल्वे ट्रॅकवर बसलेल्या तरुणाने उडवली सर्वांची झोप, VIDEO एकदा पहाच

Shocking Viral News: सोशल मीडियावर एका तरुणाचा धक्कादायक व्हिडिओ व्हायरल होत आहे.ज्यात तरुण रेल्वे रुळावर बसून फोनवर बोलत असतो.मात्र तेवढ्यात तेथून ट्रेन येते.पुढे काय घडले ते एकदा पहाच.

Tanvi Pol

Young Boy Viral Video: सध्याच्या काळात प्रत्येकाला फोनचं भयानक व्यसन लागलं आहे.अगदी सकाळी उठल्यापासून ते प्रत्येक कामात अनेकांना मोबाईल हवा असतो.संपूर्ण जीवन मोबाईलशिवाय पूर्ण होऊ शकतं नाही असे काहीचा समज आहे.मात्र,या नादात अनेकांना मोठ्या दुर्घटनांना सामोरे जावे लागते.त्यातही बऱ्याच व्यक्तींना आपल्या जीवाला मुकावे लागते.सध्याचा व्हायरल होत असलेला व्हिडिओही मोबाईलचे अतिवेड असलेल्या एका तरुणाचा आहे.

फोनवर बोलत असताना काही व्यक्तींनी कशाचेही भान राहत नाही.अनेकदा काही व्यक्तींनी अशी सवय असते की ते कुठे चालत जातील त्यांना समजत नाही तर कधी आजूबाजूला काय सुरु असतं तेदेखील कळत नाही.सध्या असाच एक प्रकार समोर आलेला आहे.ज्यात चक्क एक तरुण रेल्वे (Railway)रुळावर फोनवर बोलण्यात मग्न असतो आणि त्यावेळीच तेथून एक ट्रेन जाते.मात्र पुढे जे घडतं ते पाहून तुम्हीही तरुणाचा संताप कराल.

मोबाईलच्या नादात जीवाशी खेळ!

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओत तुम्ही पाहू शकता,एक तरुण शहरातील संपूर्ण जागा सोडून रेल्वे रुळावर फोनवर बोलत बसला आहे.मात्र त्याच वेळी रेल्वे रुळावरुन एक ट्रेन येते.लोगो पायलट ट्रेनचा अनेकवेळा हॉर्न देखील देत आहेत मात्र तरुण फोनवरच बोलण्यात मग्न आहे.मात्र लोगो पायलटच्या सतर्कतेमुळे ट्रेन थांबवली जाते आणि तरुणाचा जीव वाचला जातो,मात्र लोगो पायलट खाली उतरतो आणि तरुणाला मारण्यासाठी धावताना दिसत आहे.

व्हायरल (Viral)होत असलेल्या घटनेचा व्हिडिओ 'army_lover_ajay_yadav_ghzipur'या अकाउंटवर चार दिवसापूर्वी अपलोड करण्यात आलेला आहे.व्हिडिओ पोस्ट केल्यानंतर व्हिडिओला नेटकऱ्यांनी मोठी पसंती दिलेली असून अनेक प्रतिक्रिया केलेल्या आहेत.त्यातील एका यूजरने कमेटबॉक्समध्ये लिहिले आहे,''जाम मार दिला असेल''तर दुसऱ्या एका यूजरने लिहिले आहे,''भयंकर घटना आहे',अशा अनेक गमतीदार तर काहींनी संतापजनक प्रतिक्रिया केलेल्या आहेत.

टीप : तरुणाचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याची पडताळणी झालेली नाही. फक्त माहिती म्हणून आम्ही वाचक-प्रेक्षकांपर्यंत ही बाब पोहचवत आहोत. याचं आम्ही कोणत्याही प्रकारे समर्थन करत नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

White Clothes: अंत्यसंस्कारावेळी पांढरे कपडे का घालतात? कारण वाचून व्हाल आश्चर्यचकीत

डोनाल्ड ट्रम्प यांना बसला टॅरिफचा 'डंक'; सहा देशांकडून F-35 लढाऊ विमानांचा करार रद्द

ऐन निवडणुकीत गोळीबार, कुख्यात गुन्हेगाराची गोळ्या झाडून हत्या, परिसरात खळबळ

Ashish Deshmukh: 'जास्त कराल तर कापून काढू'; आमदार आशिष देशमुखांची विरोधकांना धमकी

दुसरं लग्न थेट गुन्हा ठरणार; तब्बल १० वर्षांचा तुरुंगवास भोगावा लागणार

SCROLL FOR NEXT