Viral Video :३ लाख रूपयांत ट्रेनचा कोच बुक केला आणि थाटली पुजा; नेटकरी चक्रावले  meta ai
व्हायरल न्यूज

VIRAL VIDEO: ३ लाख रूपयांत ट्रेनचा कोच बुक केला अन् केली पूजा; व्हिडीओ पाहून नेटकरी संतापले

Indian Railway: धार्मिक विधीसाठी संपूर्ण रेल्वे कोच खासगी बुक करण्यात आला. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून नेटकऱ्यांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.

Saam Tv

सोशल मीडियावर नुकताच एक हनिमुनसाठी ट्रेनचा कोच सजवल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. त्यावरून अनेक संतप्त प्रतिक्रिया सोशल मीडियाच्या माध्यमातून समोर आल्या होत्या. त्यातच भर म्हणून ट्रेनमध्ये पूजा केल्याचा व्हिडीओ देखील समोर आला आहे. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून रेल्वे नियमांची पायमल्ली करत असून इतर प्रवाशांच्या जीवाशी खेळत आहे. असा सवाल सोशल मीडियावर विचारला जात आहे.

सोशल मीडियावर नेटकऱ्यांनी रेल्वे प्रशासनाला धारेवर धरल्यामुळे अखेर रेल्वेला यावर स्पष्टीकरण द्यावे लागले. रेल्वेने स्पष्ट केले की, खाजगी पद्धतीने बुक केलेल्या सलून कोचमध्ये सदर पूजा मांडली गेली होती. वरिष्ठ अधिकारी, विशिष्ट आणि खास व्यक्तींसाठी किंवा प्राईवेट बुकींगसाठी हा कोच IRCTC च्या माध्यमातून उपलब्ध करून दिला जातो. ज्यात उत्तम सोई सुविधा, डिनर टेबल, किचन, उत्तम बाथरूम याची व्यवस्था असते.

दिल्ली वरून मुंबईला ही जाणारी मुंबई -बांन्द्रा टर्मिनस पश्चिम एक्सप्रेस होती. संबंधित कुटुंबाने १० जुलै २०२६ रोजीचे बुकींग दोन दिवस आधी ८ जुलै २०२६ ला केले होते . संपूर्ण नियमांचे पालन करत संबंधित कुटुंबाने हा स्पेशल कोच भाड्याने घेतला होता. कोच संबंधित ३,०८,५८० रक्कम कुटुंबाने भरली होती, त्यामुळे यात गु्न्हा दाखल करण्यासारखी कोणतीच गोष्ट नाही. असे रेल्वेने स्पष्ट केले आहे. रेल्वेत या पूजेचे आयोजन जरी करण्यात आले असले तरी त्यात प्रवाशांच्या सुरक्षेसोबत , रेल्वेच्या नियमांसोबत कोणतीही तडजोड केली नसल्याचे रेल्वेने स्पष्ट केले आहे.

Animal Facts : कोणता प्राणी उभा राहून झोपतो? ९०% लोकांना माहितीचं नाही

कुछ बडा होनेवाला है! 48 आमदारांना पीएम मोदींनी दिलं नवं मिशन; केजरीवालांसह राहुल गांधींना बसणार मोठा धक्का

देशात 'नमो'ची लाट परत आणण्यासाठी भाजपनं आखली नवी रणनीती; राज्यात ‘नमो सेवा’चा शुभारंभ

3 Gram Mangalsutra For Women: महिलांसाठी 3 ग्रॅम सोन्याचे मंगळसूत्र, रोज घालण्यासाठी एकदम बेस्ट

सुप्रीम कोर्टात पोहोचला मुख्य निवडणूक आयुक्तांचा वाद; ज्ञानेश कुमारांच्या विरोधातील याचिकेवर होणार सुनावणी

SCROLL FOR NEXT