Saam Tv
व्हायरल न्यूज

बसने स्कूटीस्वार तरुणीला चिरडले; घटनास्थळीच मृत्यू; सीसीटीव्ही व्हिडिओ आला समोर

Woman Crushed Under Bus: उत्तराखंडमधील देहरादूनमध्ये प्रायव्हेट बसने स्कूटीस्वार तरुणीला चिरडल्याची धक्कादायक घटना घडली. या भीषण अपघातात तरुणीचा जागीच मृत्यू झाला. या घटनेचा सीसीटीव्ही व्हिडिओ समोर आला असून तो सध्या व्हायरल होत आहे.

Tanvi Pol

Road Accident In Dehradu: उत्तराखंडची राजधानी देहरादूनमध्ये सोमवारी एक अत्यंत वेदनादायक अपघात घडला. या अपघातात एका स्कूटीस्वार तरुणीचा दुर्दैवी मृत्यू झाला. शिमला बायपास रोडवर झालेल्या या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली असून, घटनास्थळी पोहोचलेल्या नागरिकांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. हा अपघात एका प्रायव्हेट बसमुळे झाला असून बसने स्कूटीला मागून जोरदार धडक दिली. या धडकेमुळे तरुणीचा जागीच मृत्यू झाला.

नेमकं घडलं तरी काय?

ही घटना सोमवारी सकाळी सुमारे १० वाजण्याच्या सुमारास घडली. शिमला बायपास रस्त्यावर वाहतूक नेहमीप्रमाणे सुरू होती. त्या वेळी स्कूटीवरून एक तरुणी जात होती. पण मागून आलेल्या प्रायव्हेट बसने तिला जोरदार धडक दिली. धडकेची तीव्रता इतकी होती की ती थेट बसच्या चाकाखाली सापडली आणि तिचा जागीच मृत्यू झाला.

घटनास्थळी भीतीदायक दृश्य

अपघात घडल्यानंतर काही क्षणातच रस्त्यावर गर्दी जमू लागली. काही प्रत्यक्षदर्शींनी त्वरित पोलिसांना फोन करून घटनेची माहिती दिली. बस चालक तिथून पळून जाण्याचा प्रयत्न करत होता, मात्र स्थानिक नागरिकांनी त्याला अडवून ठेवले. काही वेळाने पोलिस घटनास्थळी दाखल झाले आणि परिस्थिती नियंत्रणात आणली. पोलीस घटनास्थळाची पाहणी करत असून सीसीटीव्ही फुटेजही तपासण्यात येत आहेत.

या घटनेचा व्हिडिओ(Video) सध्या वाऱ्याच्या वेगाने सर्वत्र व्हायरल झालेल आहे. अपघात इकता भयंकर होता की प्रत्येकाने विविध प्रतिक्रिया मांडल्या आहेत. एका यूजरने म्हटलं,''तिची चुकी होती'' दुसऱ्या यूजरने म्हटलं,''सर्व अचानक घडलं'' अशा विविध प्रतिक्रिया आलेल्या आहेत.

टीप: हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याची पडताळणी झालेली नाही. फक्त माहिती म्हणून आम्ही वाचक-प्रेक्षकांपर्यंत ही बाब पोहचवत आहोत. याचं आम्ही कोणत्याही प्रकारे समर्थन करत नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: प्रांजल खेवलकरांवरील खोट्या कारवाईच्या विरोधात उच्च न्यायालयात जाणार

Elephant Food: हत्ती काय खातो? तुम्हाला माहितीये का?

Honda N-One e: रेट्रो लूक...होंडाची नवीन N-One e कार, अल्टोपेक्षा लहान आणि खास वैशिष्ट्यांनी भरलेली

Nashik : नाशिकमध्ये गोदावरीच्या पाणी पातळीत वाढ होणार! गंगापूर धरणातून पाण्याचा विसर्ग वाढवणार | VIDEO

Russia Earthquake: भूकंपाच्या धक्क्याने हालू लागल्या बिल्डिंग, घरातील सर्व वस्तू पडल्या; नागरिकांचा जीव मुठीत; पाहा थरकाप उडवणारे VIDEO

SCROLL FOR NEXT