youth lost his life after slipping from a cliff near a scenic waterfall during a monsoon visit Saam Tv
व्हायरल न्यूज

धबधब्यावर फिरायला गेला, पाय घसरला आणि तरुण थेट खाली कोसळला; VIDEO

Waterfall Accident Video: धबधब्यावर फिरायला गेलेल्या तरुणाचा पाय घसरून तो खोल दरीत कोसळला. निसर्गसौंदर्य पाहण्यासाठी गेलेली सहल जीवावर बेतली. सोशल मीडियावर या घटनेचा व्हिडिओ व्हायरल होत आहे.

Tanvi Pol

Monsoon Trip Accident: पावसाळा सुरू झाला की अनेक तरुण-तरुणी निसर्गाच्या सान्निध्यात वेळ घालवण्यासाठी, धबधब्यांच्या सौंदर्याचा अनुभव घेण्यासाठी ट्रेकिंगला, सहलीला जातात. पण अनेकदा या सहली जीवावर बेततात, अशीच एक धक्कादायक घटना नुकतीच एका प्रसिद्ध धबधब्याजवळ घडली, जिथे एक तरुण धबधब्याच्या कडेला फोटो काढत असताना पाय घसरून थेट खाली कोसळला. या घटनेचा व्हिडिओ देखील सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे.

फोटो काढण्याच्या नादात गेला जीव

सदर तरुण आपल्या मित्रांसह सेल्फी काढत होता. काही वेळाने तो धबधब्याच्या अगदी कडेवर गेला. तिथे उभा राहून मोबाईलवर फोटो क्लिक करत असतानाच अचानक पाय घसरला. तो क्षणभर सावरायचा प्रयत्न करत असतानाच तो थेट खालच्या दरीत कोसळला. आजूबाजूला असलेले लोक किंचाळले, काहींनी मदतीसाठी धाव घेतली, तर काहींनी हा धक्कादायक क्षण कॅमेऱ्यात टिपला. काही सेकंदांत सर्व काही घडलं आणि आनंदाचा क्षण दु:खात बदलला.

जीवावर बेततोय पर्यटन

पावसाळ्यात ट्रेकिंग, धबधबे, निसर्गरम्य ठिकाणं पाहण्यासाठी जाणाऱ्यांची संख्या वाढत असली तरी सुरक्षा खबरदारीचा अभाव हा मोठा धोका निर्माण करतो. बऱ्याचदा धबधब्याजवळ स्लिपरी दगड, चिखलामुळे पाय घसरण्याच्या घटना घडतात. मात्र पर्यटक फोटो किंवा रील्ससाठी धोकादायक ठिकाणी जातात, त्याचे परिणाम जीवघेणे ठरू शकतात.

सोशल मीडियावरून लोकांमध्ये संताप

सध्या हा व्हिडिओ(VIDEO) सोशल मीडियावर खुप मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून त्यावर अनेक नेटकऱ्यांनी आपली मते व्यक्त केलेली आहेत. त्यातील एका यूजरने म्हटलं,''खुपच भयानक घडलं'' तर दुसऱ्या यूजरने म्हटलं,''किती जोरात मार लागला असेल'' अशा अनेक प्रतिक्रिया आलेल्या आहेत.

टीप : हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याची पडताळणी झालेली नाही. फक्त माहिती म्हणून आम्ही वाचक-प्रेक्षकांपर्यंत ही बाब पोहचवत आहोत. याचं आम्ही कोणत्याही प्रकारे समर्थन करत नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Gold Price Today: सोन्याने गाठला नवा उच्चांक! १ तोळा सोनं १ लाख ३२ हजारांवर; सुवर्णनगरीतील आजचे दर किती?

Famous Actor Missing : 'मुन्ना भाई एमबीबीएस'मधील लोकप्रिय अभिनेता बेपत्ता; गर्लफ्रेंडसोबत होती भांडणं, नेमकं प्रकरण काय?

Maharashtra Live News Update : निलेश गायवळ यावर आत्तापर्यंत १० गुन्हे दाखल

Accident News : समृद्धी महामार्गावर एका रात्रीत चार अपघात; सुदैवाने जीवितहानी टळली

Post Office Scheme: पोस्ट ऑफिसची जबरदस्त योजना! ५ वर्षात मिळणार ५ लाखांचं व्याज; वाचा सविस्तर

SCROLL FOR NEXT