Viral Video Saam Tv
व्हायरल न्यूज

Viral Video: आरारारा खतरनाक! मुंबई लोकलमध्ये बायकांचा पुन्हा एकदा राडा,एकमेंकीना धू धू धुतले

Mumbai Viral Video: सोशल मीडियावर सध्या मुंबई लोकलमधील एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. ज्या व्हायरल व्हिडिओ महिलांच्यामध्ये तूफान हाणामारी झालेली आहे.

Tanvi Pol

Women Fighting In Local Train: सोशल मीडियावर आपण कायम मुंबई लोकल आणि दिल्ली मेट्रोतील अनेक व्हिडिओ पाहत असतो. या दोन्ही गोष्टीचे नाव काढताच प्रवाशांची हाणामारी तर कधी कपलचा रोमान्स आणि अनेक अतरंगी गोष्टी पाहण्यास मिळतात, असा आता समज झालेला आहे आणि हे अगदी खरचं आहे. गेल्या काही वर्षात व्हायरल व्हिडिओत अशाच घटना पाहण्यास मिळतात. अशातच सोशल मीडियावर मुंबई लोकल ट्रेनमधील काही महिला प्रवाशांचा व्हिडिओ व्हायरल झालेला आहे. ज्यात नक्की काय घडलं असेल आणि ज्या घटनेमुळे व्हिडिओ व्हायरल होत असेल ते तुम्ही एकदा पाहा.

व्हायरल(Viral) होत असलेल्या व्हिडिओत तुम्हाला मुंबई लोकल दिसून येत आहे. त्यानंतर लोकल ट्रेनमधील लेडीज कंपार्टमेंट आहे. त्यात महिलांची तूफान गर्दी दिसून येत असून काही महिलांचा मोठ्या मोठ्याने गोंधळाचा आवाज येतो. जर व्हिडिओ तुम्ही नीट पाहिले तर दिसून येईल की काही महिलांमध्ये वादविवाद सुरु असतात आणि त्यानंतर त्याच महिला एकमेंकीना मारण्यास सुरुवात करतात. त्याची हाणामारी चक्क एकमेंकीचे केस पकडण्यापर्यंत गेलेली असते. त्यांच्या बाजूला असलेल्या महिला त्यांची हातापायी सोडवण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे. महिला प्रवाशांच्या हाणामारीचा व्हिडिओ(Video) त्याच ट्रेनमधील महिला प्रवाशांनी मोबाईलमध्ये कैद केलेला आहे.

महिलांच्या हाणामारीचा व्हिडिओ इन्स्टाग्राम या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर व्हिडिओ व्हायरल होत असून तो इन्स्टाग्रामवरील '@in24news' या अकाउंटवर व्हिडिओ पोस्ट करण्यात आलेला आहे. व्हिडिओ पोस्ट करत कॅप्शनमध्ये,''मुंबई लोकल'' असे लिहिण्यात आले असून अनेक हॅशटॅगही देण्यात आलेले आहे.

महिलांच्या हाणामारीचा व्हिडिओ २ दिवसापूर्वी शेअर करण्यात आलेला असून आतापर्यंत हजारो नेटकऱ्यांनी व्हिडिओला पसंती दिलेली आहे तर अजूनही व्हिडिओचे व्ह्यूज वाढत आहेत. एवढेच नाही तर अनेकांनी विविध प्रतिक्रिया केलेल्या आहेत. त्यातील एका यूजरने लिहिले आहे की,''तू अगर मेरे बॉयफ्रेंड से गुलुगुलु करेगी तो मैं धोपतुंगी ना तेरे को'' तर अनेकांनी गमंतीदार कमेट्स केलेल्या आहेत.

टीप : हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याची पडताळणी झालेली नाही. फक्त माहिती म्हणून आम्ही वाचक-प्रेक्षकांपर्यंत ही बाब पोहचवत आहोत. याचं आम्ही कोणत्याही प्रकारे समर्थन करत नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune Crime: पुण्यातील रेड लाईट एरियात बांगलादेशी महिलांचा सुळसुळाट; अनधिकृत प्रवेश करत वेश्या व्यवसाय

ITR Filling 2025: ITR फाइल करताना पासवर्ड विसरलात? काळजी करु नका, या पद्धतीने भरा रिटर्न

Maharashtra School: पहिलीच्या वेळापत्रकातून हिंदी हद्दपार, सुधारित वेळापत्रक जाहीर

Shukrawar che Upay: शुक्रवारच्या दिवशी 'या' चमत्कारी उपायांनी नशीब उजळेल; करियर-कुटुंबातील अडखळे होतील दूर

Indore Street Food: फक्त पोहेच नाही, इंदूरची 'हे' स्ट्रीट डिशेस देखील आहेत अव्वल दर्जाचे

SCROLL FOR NEXT