Viral Video Saam Tv
व्हायरल न्यूज

Viral Video: अय्यो! काकांचा शक्तीमान अवतार; तरुणाला असं अलगद हवेत उचललं; VIDEO पाहून डोक धराल

Shocking Video: दररोज सोशल मीडियावर विविध व्हिडिओ पाहायला मिळतात. मात्र सध्या दोन व्यक्तींचा धक्कादायक असा व्हिडिओ व्हायरल होत आहे. ज्यामध्ये त्यांनी एक स्टंट केलेला आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

सोशल मीडियावर कायम अनेक अतरंगी व्हिडिओ व्हायरल होत असतात. याच सोशल मीडियाच्या मार्फत जगाच्या कानाकोपऱ्यातील व्यक्तीच्या कला किंवा कोणतीही घटना ताबडतोब अनेकांपर्यंत पोहचते. एवढेच नाही तर याच सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रत्येक क्षणार्धात प्रसिद्धीच्या झोतात येतो. सध्या अशाच एक व्हिडिओ देशभरातील नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेत आहे, ज्यात दोन व्यक्तींनी अस काही केल आहे, जे पाहून तुम्हाला तुमच्या डोळ्यांवर विश्वास ठेवणे कठीण जाईल.

आपल्यापैंकी प्रत्येकाला स्टंटचे (Stunt) व्हिडिओ पाहण्यासाठी आवडतात. तर लहानपणी आपण सर्कस पाहण्यासाठी गेलोच असेल तिथे अनेक प्रताप आपल्याला दाखवण्यात येतात. ते पाहून भल्याभल्यांना आश्चर्य वाटयचे. मात्र ते सर्व स्टंट सर्व गोष्टींची काळजी (Care) घेऊन केले जात असत. मात्र सध्या व्हायरल होत असलेल्या व्हिडिओत ही दोन व्यक्तींनी थरारक स्टंट केलेला आहे. जो पाहून मनात धडकी बसल्याशिवाय राहणार नाही.

व्हायरल (Viral) होत असलेल्या व्हिडिओत अनेक व्यक्ती दिसून येत आहे. मात्र काही वेळात तिथे दोन व्यक्ती येतात. त्या दोन व्यक्तींच्या हातात एक एक वस्तू दिसून येतेय. मात्र काही वेळात त्यांना हातात असलेली वस्तू तोंडात ठेवतात मग एक व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीला हाताने उचलतो आणि तोल साभांळत त्या वस्तूवर उलटा उभा करतो. शेवटी तुम्ही पाहू शकता, अतिशय उकृष्टरित्या दोघांनी एकमेंकाना साथ देत अनोखा व्हिडिओ (Video) बनवलेला आहे. संपूर्ण व्हिडिओ तिथे असलेल्या एका व्यक्तीने कॅमेऱ्यात कैद केलेला आहे.

व्हायरल (Viral) होत असलेला व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवरील ''@RVCJ_FB'' या अकाउंटवर शेअर करण्यात आलेला आहे. व्हिडिओ पोस्ट (Post) करत कॅप्शनमध्ये,''आश्चर्यकारक शक्ती'' असे लिहिण्यात आलेले आहे. व्हिडिओ एक दिवसांपूर्वी पोस्ट करण्यात आल्यानंतर दोन हजाराहून अधिकचे लाईक्स मिळाले आहे तर लाखोंच्या संख्येने व्ह्यूज आणि दुसऱ्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर शेअर करण्यात देखील येत आहे. एवढेच नाही तर अनेक यूजर्संनी आश्चर्यकारक प्रतिक्रिया व्हिडिओवर केलेल्या आहेत.

टीप : हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याची पडताळणी झालेली नाही. फक्त माहिती म्हणून आम्ही वाचक-प्रेक्षकांपर्यंत ही बाब पोहचवत आहोत. याचं आम्ही कोणत्याही प्रकारे समर्थन करत नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune Ganpati Visarjan: पुण्यातील मानाच्या पाचही गणपतींचे भव्य विसर्जन संपन्न|VIDEO

Maharashtra Live News Update: शिवसेनेच्या दसरा मेळाव्याला राज ठाकरे शिवतीर्थावर जाणार

Breaking News : ऐन गणेशोत्सवात मोठी दुर्घटना; रोपवे तुटल्याने ६ जणांचा मृत्यू

OBC/ Maratha Reservation: मुख्यमंत्री फडणवीसांसमोर आखणी एक आव्हान; उपराजधानीत निघणार भव्य मोर्चा

Anant Chaturdashi 2025 live updates : पुण्यातील पाचही मानाच्या गणपतीचे विसर्जन

SCROLL FOR NEXT