Tourist Viral Video Saam TV
व्हायरल न्यूज

Tourist Viral Video : थायलंड आणि बालीचा फिल भारतात; उन्हाळ्याच्या सुट्टीत फिरण्यासाठी नयनरम्य ठिकाण

Viral Video : या व्यक्तीने थायलंड आणि बाली सारखं भारतामधील एक ठिकाण शोधून काढलं आहे. या ठिकाणचा व्हिडिओ आणि माहिती देखील या व्यक्तीने आपल्या सोशल मीडियावर पोस्ट केली आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Thailand and Bali Feel in India :

उन्हाळा सुरू झाला आहे अशात सर्वजण आपल्या उन्हाळ्याच्या सुट्ट्या एन्जॉय करण्यासाठी विविध ठिकाणे शोधत आहेत. अशात सोशल मीडियावर एका पर्यटक प्रेमी व्यक्तीचा व्हिडिओ जोरदार व्हायरल होत आहे. या व्यक्तीने थायलंड आणि बाली सारखं भारतामधील एक ठिकाण शोधून काढलं आहे. गोव्यातील या रिसॉर्टचा व्हिडिओ आणि माहिती देखील या व्यक्तीने आपल्या सोशल मीडियावर पोस्ट केली आहे.

@Arihantbaid या इंस्टाग्राम अकाऊंटवर या व्यक्तीने व्हिडिओ पोस्ट केला आहे. हे ठिकाण यापूर्वी कोणत्याही सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर तुम्ही पाहिले नसेल असा दावा या व्यक्तीने केला आहे. परदेशी बिच डेस्टिनेशनपेक्षा चांगले वाईब्स देणारे हे ठिकाण दक्षिण गोव्यात, दाबोलिम आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या दक्षिणेस ५५ किमी अंतरावर आहे. येथे तुम्ही बाय रोड देखील जाऊ शकता.

येथे परदेशात असतात तशी गोल आकाराची घरे आहे. तसेच येथील समुद्रकिनारे देखील अफलातून सुंदर आहेत. इतर समुद्रकिनाऱ्याच्या तुलनेत येथे जास्त शांतता आणि स्वच्छता आहे.

या जबरदस्त रिसॉर्टचे डिझाईन आर्किटेक्ट श्री. सर्वज्ञ यांनी केले आहे. येथे तुम्हाला समुद्र किनारी सुंदर सूर्योदय आणि सूर्यास्त पाहता येईल. अशी माहिती या व्हिडिओमध्ये देण्यात आली आहे.

येथील रिसॉर्टचा एक व्हिडिओ देखील तुम्ही पाहू शकता. येथील संपूर्ण वातावरण माईंड आणि मुड फेश करणारं आहे. या समुद्रकिनाऱ्याला अनेक नारळाची झाडे देखील आहेत. त्यामुळे साऊथ गोवामधील या ठिकाणी तुम्ही तुमच्या यंदाच्या उन्हाळ्याच्या सुट्ट्या मस्त एन्जॉय करू शकता.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मोठी बातमी ! मतदारसंघ पुनर्रचना विधेयकासाठी जोरदार राजकीय हालचाली; संसदेचे विशेष अधिवेशन बोलावणार?

Maharashtra News Live Update: शिवसेनेवर अंतिम शिक्कामोर्तब? शिंदे-ठाकरे वादावर सुप्रीम कोर्टात सुनावणी सुरु

मराठवाड्यात 3 जणांचं कुणबी प्रमाणपत्र अवैध; मनोज जरांगे फडणवीस सरकारवर संतापले|VIDEO

Kalyan : सख्ख्या मुलीवर अत्याचार करणाऱ्या बापाला थेट जन्मठेपेची शिक्षा, कल्याण कोर्टाचा ऐतिहासिक निकाल

Supreme Court: CJP वर कारवाई करा; याचिकेवर सुप्रीम कोर्टाची महत्त्वाची टिप्पणी, वाचा नेमकं प्रकरण काय?

SCROLL FOR NEXT