Viral Video Saam Tv
व्हायरल न्यूज

Fighting Viral Video: बसमध्ये महिलांचा राडा! सीट मिळवण्यासाठी तूफान हाणामारी; घटनेचा व्हिडिओ व्हायरल

Viral Video: सोशल मीडियावर दररोज अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात. त्यात कधी कधी महिलांच्या हाणामारीचे व्हिडिओ असतात.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

आपल्यापैंकी अनेकजण दररोज कामानिमित्त प्रवास करत असतो. हा प्रवास कधी ट्रेनचा असतो कधी बसचा असतो.याच प्रवासादरम्यान अनेक प्रसंग घडत असतात. याच प्रवासामधील अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. त्यातच बसमधील प्रवासाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओत बस दिसून येत आहे. काही प्रवासी बस(Bus)मधून प्रवास करत आहेत. त्यात या व्हायरल व्हिडिओत काही महिला प्रवासीही दिसून येत आहेत. एक महिला प्रवासी खिडकीच्या बाजूला बसलेली आहे तर दुसरी महिला तिच्या बाजूला उभी आहे. काही वेळात दोंघीमध्ये जोरदार वाद सुरु होतात. हे वाद इतके टोकाला जातात की, चक्क दोंघी एकमेंकींना मारायला लागतात. यांचे वाद सुरु असताना तिथे असलेला एक व्यक्ती त्यांना थांबवण्याचा प्रयत्न करतो मात्र त्या कोणाचेही ऐकण्याच नाव घेत नाही.

व्हायरल होत असलेल्या या महिलांनी बसच्या सीटवरुन हाणामारी केल्याचे समजते. महिल्यांच्या हाणामारीचा व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवरील @TeluguScribe या अकाउंटवर शेअर करण्यात आलेला आहे. सोशल मीडियावर याआधीही मुंबई लोकल ट्रेन(Train)मधील महिलाच्या वादविवादाचे तसेच हाणामारीचे व्हिडिओ पाहिले आहेत.मात्र सध्या व्हायरल होत असलेला व्हिडिओ सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे.

व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर अनेक नेटकऱ्यांनी विविध प्रतिक्रिया दिल्या आहेत. त्यातील एका यूजरने लिहिले आहे की, हे नेहमीचे झाले आहे. तर आणखी एका यूजरने लिहिले आहे की, अजून जोरात मारा एकमेंकीना

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मी शिवसेनेत जाण्याचा निर्णय घेतलाय!; ओमराजे निंबाळकरांनी सांगितली ठाकरे गट सोडण्याची कारणं

NEET Student: 'मला माफ करा...' नीटच्या आणखी एका विद्यार्थिनीची आत्महत्या, मृतदेह पाहून कुटुंबीय हादरले

Chhatrapati Sambhajinagar : पावसाळ्यातील स्वर्ग! 200 फूट उंचीवरून कोसळणारा संभाजीनगरचा धबधबा पर्यटकांना घालतो भुरळ

महिला शेतकऱ्यांना कायदेशीर दर्जा मिळणार,अधिवेशनात 10 विधेयके मांडणार: मुख्यमंत्री

Maharashtra News Live Update: पहिल्याच पावसात महाडच्या रस्त्यावर पाणी साचले

SCROLL FOR NEXT