Smoke Biscuit Video Saam Tv
व्हायरल न्यूज

Viral Video: धक्कादायक! स्मोक बिस्किट खाल्ल्याने मुलाचा मृत्यू, हसत्या खेळत्या कुटुंबावर दु:खाचा डोंगर

Viral Video Of Child: लहान मुले खूप निरागस आणि हट्टी असतात. अनेकदा नवीन गोष्ट दिसल्यावर ते आकर्षित होतात आणि ती गोष्ट घेण्याचा हट्ट करतात.परंतु हाच हट्ट एका मुलाच्या जीवावर बेतला आहे. तमिळनाडूमध्ये स्मोक बिस्किट खालल्यावर एका मुलाचा मृत्यू झाला आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

लहान मुले खूप निरागस आणि हट्टी असतात. अनेकदा नवीन गोष्ट दिसल्यावर ते आकर्षित होतात आणि ती गोष्ट घेण्याचा हट्ट करतात. परंतु अनेकदा या नवीन गोष्टी ट्राय करणे आपल्या जीवावरदेखील बेतू शकते. त्यामुळे पालकांनी मुलांना नवीन गोष्टी ट्राय करु देऊ नये. याबाबत काळजी बाळगा. असाच एक लहान मुलाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओत लहान मुलाला नवीन गोष्टी ट्राय करायला देणं चांगलच महागात पडलं आहे.

व्हायरल व्हिडिओत, एक लहान मुलगा नायट्रोजन स्मोक बिस्किट खाताना दिसत आहे. परंतु हे बिस्किट खालल्यानंतर त्या मुलाची तब्येत अचानक बिघडली. याचदरम्यान त्या मुलाचा मृत्यू झाला आहे. या टनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

व्हायरल व्हिडिओत एक लहान मुलगा नायट्रोजन स्मोक बिस्किट खाताना दिसत आहे. बिस्किट खाताना त्यातून स्मोक म्हणून धूर बाहेर पडताना दिसत आहे. स्मोक बिस्किट खालल्यानंतर त्या मुलाला बरं वाटतं नाही. तो ते बिस्किट तिथेच खाली फेकून देतो. त्यानंतर आपल्या कुटुंबियांकडे जातो. मुलाची प्रकृती अचानक बिघडल्याने मुलाचे कुटुंबिय चिंतेत पडलेले दिसत आहेत. ते या मुलाला पाणी देतात. त्याची पाठ थोपटताना दिसत आहे. मुलगा खूप जास्त अशक्त होतो. त्यानंतर काही वेळातच त्याचा मृत्यू होतो. मुलाचा अचानक मृत्यू झाल्याने कुटुबियांना मात्र खूप मोठा धक्का बसल्याचे दिसत आहे.

mohandreamer या एक्स अकाउंटवरुन हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. स्मोक बिस्किटांवर ताबडतोब बंदी घालायला हवी. स्मोक बघून मुले बिस्किट खायला आतूर होतात. मात्र, यात नायट्रोजन असतो. हा पदार्थ एक चमचा जरी आपल्या पोटात गेला तर धोकादायक ठरू शकते, असं कॅप्शन या व्हिडिओला देण्यात आलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune News: पुण्यात फायनान्स कंपनीविरोधात शिंदेसेना आक्रमक, शेतकऱ्याच्या घराचं सील तोडलं

Train Accident: २ प्रवासी ट्रेनची एकमेकांना धडक, आतापर्यंत ४ प्रवाशांचा मृत्यू; ८८ जण गंभीर जखमी

Monday Horoscope: या राशींच्या आयुष्यात होणार मोठे बदल! कोणाला मिळणार पैशांचा लाभ? वाचा राशिभविष्य

Weight Loss Tips : वजन कमी करण्याचं सिक्रेट; 5 पदार्थ दररोजच्या आहारातून करा हद्दपार

Khan Saree Designs: महिलांसाठी खणाच्या साड्यांच्या लेटेस्ट डिझाईन्स, हे 5 पॅटर्न्स दिवाळीत दिसतील उठून

SCROLL FOR NEXT