Taiwan Earthquake video  Saam Tv
व्हायरल न्यूज

Taiwan Earthquake: नीडर पत्रकारिता! ७.२ रिश्टेल स्केल तीव्रतेचे भूकंपाचे धक्के; तरीही सुरूच ठेवली अँकरिंग

Taiwan Earthquake : तैवानमध्ये जेव्हा भूकंपाचे धक्के जाणवले तेव्हाचे दृश्य या लाइव्ह फुटेजमध्ये कैद झालेत. धक्के जाणवण्याची ही वेळ सकाळी ७.५९ (स्थानिक वेळेनुसार) दर्शवण्यात आलीय.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Taiwan Earthquake News Anchor Video Viral :

तैवानमध्ये सुमारे ७.२ तीव्रतेचा भूकंप झाला. त्यानंतर जपानमध्ये त्सुनामीचा इशारा देण्यात आलाय. तैवान सरकारने जारी केलेल्या अपडेटनुसार बुधवारी पहाटे तैवानची राजधानी तैपेईमध्ये हा भूकंप झाला. यात मोठ्या प्रमाणात वित्त आणि जीवितहानी झालीय. भूकंपाचे धक्के जाणवल्यानंतर मोठं-मोठ्या इमारती हादरल्या. या घटनेचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. यात व्हिडिओमध्ये एक न्यूज स्टुडिओचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय. (Latest News)

व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये तीव्र भूकंपाचे धक्के जाणवताना दिसत आहेत. तैवानमध्ये जेव्हा भूकंपाचे धक्के जाणवले तेव्हाचे दृश्य या लाइव्ह फुटेजमध्ये कैद झालेत. धक्के जाणवण्याची ही वेळ सकाळी ७.५९ (स्थानिक वेळेनुसार) दर्शवण्यात आलीय. या धक्क्यामुळे स्टुडिओमधील कॅमेरे हलू लागलेत. तरीही टीव्हीची वृत्त निवेदिका (अँकर) जिवाची पर्वा न करता बातम्यांचे वाचन करताना दिसत आहे.

हा व्हिडिओ SET iNews चा स्टुडिओचा असल्याचं दिसत आहे. देशात आलेल्या नैसर्गिक संकटाची माहिती वृत्त वाहिनीकडून दिली जात होती. देशातील नागरिकांना या संकटाची माहिती मिळावी, यासाठी वृत्तवाहिनीकडून बातम्या प्रसारित केल्या जात होत्या. व्हायरल व्हिडिओमध्ये दिसणारी वृत्त निवेदिका स्टुडिओतून लाइव्ह बातमी देत होती.त्यावेळी भूकंपाचे धक्के जाणवले.या धक्क्यामुळे स्टुडिओमधील कॅमेरे आणि लाईट्स हालताना दिसत आहेत.

हा व्हिडिओ सुरू होतो तेव्हा वृत्त निवेदिका प्रेक्षकांना बातम्यांचे अपडेट्स वाचताना दिसते. जेव्हा कॅमेरा अचानकपणे स्टुडिओ सेटिंग्ज दाखवण्यासाठी पॅन केला जातो, त्याचवेळी भूकंपाचे धक्के जाणवू लागतात. हे सर्व दृश्य कॅमेऱ्यात कैद झालेत. भूकंपाचे तीव्र धक्के जाणवल्यानतंरही वृत्त निवेदिका चांगल्या बातम्या वाचण्यसाठी आपले शंभर टक्के प्रयत्न देते. लोकांना नैसर्गिक आपत्तीची माहिती पोहोचवण्याचे काम ती योग्य पद्धतीने चालू ठेवते. व्हिडिओ व्यवस्थित चालू राहावा यासाठी वृत्त निवेदिका प्रोजेक्टरला ठेवते.

तैवानला भूकंप झाला तेव्हाचा क्षण टिपणारा हा व्हिडिओ बहुतेक लोकांनी शेअर आणि फॉरवर्ड केलाय. सोशल मीडियावर हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर या वृत्त निवेदिकेवर नेटकऱ्यांकडून कौतुकाचा वर्षाव होतोय. "या तैवानच्या न्यूज अँकरला सलाम," असं इंटरनेट युझर्स म्हणालेत. आज बुधवारी पहाटे तैवानला मोठा भूकंप झाला. संपूर्ण शहरातील उंच उंच इमारती कोसळल्या. भूकंप सकाळी ७.५८ वाजता आला. राजधानी तैपेईमध्ये सर्वाधिक भूकंपाचे धक्के जाणवले. जपानने त्याच्या काही प्रदेशांमध्ये त्सुनामीचा इशारा दिलाय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Famous Actor Missing : 'मुन्ना भाई एमबीबीएस'मधील लोकप्रिय अभिनेता बेपत्ता; गर्लफ्रेंडसोबत होती भांडणं, नेमकं प्रकरण काय?

Maharashtra Live News Update : निलेश गायवळ यावर आत्तापर्यंत १० गुन्हे दाखल

Accident News : समृद्धी महामार्गावर एका रात्रीत चार अपघात; सुदैवाने जीवितहानी टळली

Post Office Scheme: पोस्ट ऑफिसची जबरदस्त योजना! ५ वर्षात मिळणार ५ लाखांचं व्याज; वाचा सविस्तर

Lifestyle: हार्ट अटॅक आणि स्ट्रोक येण्यामागे आपल्या 'या' घाणेरड्या सवयी कारणीभूत; धोका कोणाला जास्त?

SCROLL FOR NEXT