Viral News  Saam Tv
व्हायरल न्यूज

Viral Video: ग्राहकाची इच्छा पूर्ण करण्यासाठी स्विगीची अनोखी शक्कल, बँड-बाजासोबत गाठलं ग्राहकाचं घर

Swiggy Instamart : आजकाल जेवण असो वा किराणा माल सर्वकाही घरबसल्या ऑनलाइन मिळते. त्यासाठी स्विगी कंपनी नेहमी नवनवीन ऑफर्स देत असते. स्विगीने आता एका ग्राहकाची इच्छा पूर्ण करण्यासाठी थेट बँड बाजा पाठवला आहे. याचा व्हिडिओ व्हायरल होत आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Swiggy Instamart Viral Video:

आजकाल प्रत्येक गोष्ट ऑनलाइन मिळते. त्यात अगदी किराणामाल ते जेवण सर्वकाही घरबसल्या ऑनलाइन पद्धतीने आपण ऑर्डर कुरु शकतो. यात स्विगी कंपनीचे नाव अग्रेसर आहे. कंपनीचे स्विगी इन्स्टामार्ट हे किराणामाल डिलिव्हरी करण्याचे ऑनलाइन अॅप आहे. स्विगी नेहमीच ग्राहकांचा विचार करुन काहीतरी नवीन करते. नवनवीन वस्तूंवर डिस्काउंट देते. स्विगीने अशीच एक इच्छा एका ग्राहकाची पूर्ण केली आहे. याचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. (Latest News)

स्विगी इन्स्टामार्टने (Swiggy Instamart) नवीन वर्षासाठी खास पोस्ट शेअर केली होती. जर या वर्षात तुमची कोणती इच्छा बकेट लिस्टमध्ये असेल आणि ती पूर्ण झाली नसेल तर आम्हाला सांगा. आम्ही ती नक्की पूर्ण करु. या पोस्टवर कमेंट केलेल्या एका ग्राहकाची इच्छा कंपनीने एकदम हटक्या पद्धतीने पूर्ण केली आहे. याचा व्हिडिओ सध्या प्रचंड व्हायरल होत आहे.

स्विगी इन्स्टामार्टच्या या पोस्टवर एका युजरने कमेंट केली होती की, 'या वर्षी मला खरंच हॉट दिसायचं होते'. या ग्राहकाची इच्छा पूर्ण करण्यासाठी स्विगीच्या कर्मचाऱ्यांनी थेट ग्राहकाचे घर गाठले. बँड-बाजा वाजवत त्यांनी ग्राहकाला सरप्राइज दिले. बँड बाजा वाजवत ग्राहकाला हिटर गिफ्ट म्हणून दिला आहे. याचा व्हिडिओ स्विगीने सोशल मीडियावर शेअर केला आहे. 'तुम्ही नेहमी हॉट राहण्यासाठी हा खास हिटर तुमच्यासाठी', असे कॅप्शन या व्हिडिओला देण्यात आले आहे.

स्विगीच्या या हटके आयडियाला नेटकऱ्यांनी मात्र खूप चांगला प्रतिसाद दिला आहे. अनेकांनी या पोस्टवर आपल्या इच्छा व्यक्त केल्या आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Raja Shivaji Collection: रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी'ची लवकरच १०० कोटी क्लबमध्ये एन्ट्री; गुरुवारी केली बक्कळ कमाई

Maharashtra News Live Update: पुणे जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीला सुनेत्रा पवार विधान भवनात

महाराष्ट्रात पेट्रोल-डिझेल दरवाढीचा भडका उडाला; सर्वाधिक स्वस्त पेट्रोल कोणत्या जिल्ह्यात?

Dr.Anand Nadkarni : प्रसिद्ध मानसोपचार तज्ज्ञ, लेखक डॉ. आनंद नाडकर्णी यांचं निधन

Diabetes Control Sugar Free Drink: डायबिटीजसाठी 'हे' 5 ड्रिंक्स आहेत वरदान; रक्तातील साखर वाढणार नाही

SCROLL FOR NEXT