Viral Video Saam TV
व्हायरल न्यूज

Viral Video : दात आहेत की खिळे! पठ्ठ्याने थेट तोंडाने उचलली सिमेंटने भरलेली गोणी; VIDEO पाहून व्हाल थक्क

Man Picked up Cement Bag With His Teeth : एका व्यक्तीने थेट आपल्या दातांनी सिमेंटने भरलेली एक गोणी उचलून घेतली आहे. सदर व्यक्ती एक कामगार आहे.

Ruchika Jadhav

काही व्यक्ती इतके ताकतवर असतात की ते कितीही जड सामान उचलू शकतात. Guinness World Record मध्ये तुम्ही अनेक चकित करणारे रेकॉर्ड बनवणाऱ्या व्यक्ती पाहिल्या असतील. आता देखील सोशल मीडियावर एक भन्नाट व्हिडिओ व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमध्ये व्यक्तीने केलेली करामत पाहून तुम्हाला स्वत:च्याच डोळ्यांवर विश्वास बसणार नाही.

व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एका व्यक्तीने थेट आपल्या दातांनी सिमेंटने भरलेली एक गोणी उचलून घेतली आहे. सदर व्यक्ती एक कामगार आहे. दररोज काम करून हातावरचं पोट अससेल्या या व्यक्तीने केलेलं हे धाडसं पाहून सर्वांनाच आपल्या डोळ्यांवर विश्वास ठेवणं कठीण झालं आहे. व्हिडिओमध्ये पुढे दिसत आहे की, हा व्यक्ती आधी हिरो स्टाइलने आपल्या अंगातील शर्ट काढतो. त्यानंतर आपल्या दातांनी तो सिमेंटने भरलेली गोणी पकडून घेतो.

सिमेंटने भरलेली गोणी हाताचा कोणताही आधार न घेता त्याने उचलून घेतली आहे. तसेच काही अंतर चालून तो पुढे येतो, तिथे काही विटांवर आणखी एक मोठी सिमेंटने भरलेली गोणी ठेवलेली असते. हा व्यक्ती ती गोणी देखील आपल्या हातांनी पाठीवर उचलून घेतो. पाठीवर एक गोणी आणि दातांमध्ये दुसरी गोणी पकडून तो बरंच अंतर सरळ चालत जातो. त्याने केलेला हा स्टंट एका व्यक्तीने आपल्या फोनमध्ये कैद केला आहे. हा व्हिडिओ @kunvarmajhi या इंस्टाग्राम अकाउंटवर पोस्ट करण्यात आलाय.

हा व्हिडिओ आता सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. व्हिडिओ पाहून नेटकरी सुद्धा थक्क झालेत. पठ्ठ्याच्या ताकदीला मानलं पाहिजे. तू कोणती टूथपेस्ट वापरतो?, घाम आणि रक्त गाळून कमवलेल्या भाकरीची ही ताकद आहे, हे एका कामगाराचं शरीर आहे, अशा अनेक कमेंट करत नेटकऱ्यांनी या व्यक्तीचं कौतुक केलं आहे.

आपली ताकद दाखवतानाचा त्याचा आणखी एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमध्ये त्याने आपल्या हाताने लाल मातीच्या विटा एका बुक्कीत फोडल्यात. त्याच्यासमोर काही विटांचा ढिग आहे. त्यावर तो एकएक करून सर्व विटा ठेवतो आणि फोडतो. त्याच्या या व्हिडिओला देखील अनेक लाइक्स आलेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sunday Horoscope : आषाढी एकादशीला होणार विष्णूची कृपा; 'या' राशींच्या लोकांवर धनाचा वर्षाव होणार

Ind vs Eng Live, 2nd Test: अबब! इंग्लंडच्या संघासमोर ६०० पेक्षा जास्त धावांचं आव्हान; टीम इंडियाकडून डाव घोषित

एकत्र आलो एकत्र राहण्यासाठी; गर्दी मराठी भाषेवरच्या अन्यायाविरोधातील, वरळीतल्या ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याची

8 Hour Sleep: शरीराला ८ तासाच्या झोपेची आवश्यकता का आहे? वाचा महत्वाचे कारण

Maharashtra Politics: ठाकरे नडणार, महायुतीला भिडणार? राज-उद्धव ठाकरेंची युती बदलणार सत्तेचं गणित?

SCROLL FOR NEXT