Andhra Pradesh Video Saamtv
व्हायरल न्यूज

Dog Attack Video: एकटा चिमुकला अन् ५ कुत्री, खाली पाडून अक्षरशः लचके तोडले; भयानक VIDEO

Andhra Pradesh Video: सुदैवाने एक दुचाकीस्वार त्या ठिकाणी पोहोचल्याने मोठा अनर्थ टळला. या संपूर्ण घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल होत आहे.

Gangappa Pujari

Dog Attack Viral Video:

रस्त्यावर मोकाट फिरवणाऱ्या जनावरांमुळे अनेक अपघात झाल्याच्या घटना वारंवार समोर येत असतात. गेल्या काही दिवसांपासून भटक्या कुत्र्यांनी हल्ला केल्याचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. सध्या असाच काळीज पिळवटून टाकणारा प्रकार आंध्रप्रदेशमधून समोर आला आहे. आंध्रप्रदेशमध्ये सहा वर्षीय चिमुकल्यावर भटक्या कुत्र्यांनी हल्ला चढवल्याची घटना घडली. ज्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

आंध्र प्रदेशातील (Andhra Pradesh) गुंटूर जिल्ह्यात शनिवारी (३० डिसेंबर) भटक्या कुत्र्यांनी एका सहा वर्षांच्या चिमुरड्यावर हल्ला केला. कार्तिकेय नावाचा मुलगा संपत नगर येथील शिव मंदिराजवळ कराटे क्लाससाठी जात असताना ही घटना घडली. कुत्र्यांच्या या हल्ल्यात हा चिमुकला गंभीर जखमी झाल्याचे सांगण्यात येत आहे.

मुलगा रस्त्याने जात असतानाच अचानक पाच सहा कुत्र्यांनी पाठलाग करत त्याच्यावर हल्ला चढवला. यावेळी मुलाला खाली पाडून कुत्र्यांनी त्याच्या शरिराचे अक्षरशः लचके तोडले. सुदैवाने एक दुचाकीस्वार त्या ठिकाणी पोहोचल्याने मोठा अनर्थ टळला. या संपूर्ण घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल होत आहे.

कुत्र्याच्या हल्ल्यामध्ये मुलाला गंभीर दुखापत झाली असून त्याला उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. कार्तिकेयचे आईवडील हैद्राबादला असतात. तो इकडे सुट्टीसाठी आला असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. हा व्हिडिओ समोर आल्यानंतर नेटकऱ्यांनी संतप्त प्रतिक्रिया दिल्या आहेत. (Latest Marathi News)

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Updates: नाशिक जिल्ह्यात उद्धव ठाकरे यांची तोफ धडाडणार

Maharashtra Politics : मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, देवेंद्र फडणवीस यांचं मोठं वक्तव्य

Railtel Recruitment: सरकारी कंपनीत नोकरी करण्याची सुवर्णसंधी;अप्रेंटिस पदासाठी भरती सुरु; पात्रता काय? जाणून घ्या

गौरी खानला शालिनी पासीबद्दल जाणवते चिंता, काय आहे नेमक कारण?

Viral Video: वाह! काटा लगा गाण्यावर लोकलमध्ये प्रवाशांची जुगलबंदी, आजोबांनाही केला हटके डान्स; पाहा व्हिडिओ

SCROLL FOR NEXT