ST Drivers Viral Video saam tv
व्हायरल न्यूज

Viral Video: पायरी एकीकडे, दरवाजा दुसरीकडे; ड्रायव्हरने दाखवली एसटी बसची अवस्था, पाहा व्हायरल VIDEO

Viral Video On ST Drivers: सध्या एक एसटी चालकाचा व्हिडीओ मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे, ज्यात त्याने एसटीमध्ये चढण्याच्या प्रक्रियेवरील आपली व्यथा हसत हसत मांडली आहे.

Dhanshri Shintre

सोशल मीडियावर कधी काय व्हायरल होईल हे सांगता येत नाही. सध्या एक एसटी चालकाचा व्हिडीओ मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे, ज्यात त्याने एसटीमध्ये चढण्याच्या प्रक्रियेवरील आपली व्यथा हसत हसत मांडली आहे. व्हिडीओमध्ये एसटी केबिनमध्ये चढण्यासाठी टप्पे बनवले गेले आहेत, पण गाडीचा दरवाजा एका बाजूला आणि चढण्यासाठीचे टप्पे दुसऱ्या बाजूला असल्यामुळे, एसटी चालकाने व्हिडीओच्या माध्यमातून प्रश्न विचारला, "आता मी गाडीत चढू कसा?" त्याच्या या मजेशीर प्रश्नामुळे व्हिडीओला सोशल मीडियावर मोठी लोकप्रियता मिळाली आहे.

एसटी ड्रायव्हरने एक गमतीशीर व्हिडीओ बनवत आपल्या समस्येला वाचा फोडली आहे, ज्यामुळे अनेकांना डोक्यावर हात मारायला लागले. व्हिडीओमध्ये ड्रायव्हर एसटीच्या चढण्याच्या अजब परिस्थितीवर बोलतो आहे, विशेषत: शिवशाही गाड्यांबद्दल. त्याच्या या व्हिडीओने सोशल मीडियावर चांगलीच धूम माजवली आहे. व्हिडीओ पाहून लोक विविध प्रकारच्या प्रतिक्रिया देत आहेत, आणि अनेकांनी "हे अजब डोकं कोणाचं?" असा सवाल विचारला आहे.

व्हिडीओमध्ये एसटी चालक हसत हसत सांगत आहे की, पायरी एका बाजूला आणि दरवाजा दुसऱ्या बाजूला बसवले आहेत. त्याने मजेशीर पद्धतीने प्रश्न विचारला, "आता या पायरीवरून गाडीत कसा चढू?" जरी चालकाने हसतमुखाने यावर सवाल केला असला तरी, एसटी महामंडळाला या प्रकारावर गांभीर्याने विचार करण्याची आवश्यकता आहे. ड्रायव्हरने उठवलेला मुद्दा एसटी गाड्यांच्या डिझाइनमुळे प्रवाशांना होणाऱ्या समस्यांचा दर्शक आहे.

हा व्हायरल व्हिडीओ ट्विटरवर "Shekhar p" या अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे. आतापर्यंत १३ हजारांहून अधिक लोकांनी हा व्हिडीओ पाहिला आहे, आणि ५०० पेक्षा अधिक लोकांनी त्याला लाईक केले आहे. व्हिडीओ हळूहळू मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे. यावर एका यूजरने कमेंट केली आहे, "बस गमतीशीर बनवली आहे.. उगाच ड्रायव्हरला दोष देवून काय फायदा?" या कमेंटने लोकांच्या आणखी विविध प्रतिक्रिया उमटत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

दिल्लीमध्ये मोठी दुर्घटना! खासदारांच्या निवासस्थानाला भीषण आग, अग्निशमन दल घटनास्थळी; VIDEO

Maharashtra Live News Update : गेवराई तालुक्यातील मादळमोही येथे धनगर समाज बांधवाची आत्महत्या

Mumbai-Pune Electric Highway : मुंबई-पुण्याचा प्रवास आता आणखी स्वस्तात, इलेक्ट्रिक हायवेमुळे होणार फायदाच फायदा, वाचा सविस्तर

SIM Card Rules: सतर्क राहा! जास्त सिमकार्ड ठेवाल तर सरकारची कारवाई, नियम मोडल्यास २ लाख रुपयांचा दंड

Shirdi Sai Sansthan: साई संस्थेच्या 47 अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल; शिर्डीत खळबळ, कारण काय? VIDEO

SCROLL FOR NEXT