Star-marked ₹500 notes are genuine and legally valid, confirms RBI clarification. SAAM TV
व्हायरल न्यूज

स्टार चिन्ह असलेली नोट नकली? 100, 500 च्या नकली नोटा चलनात?

Are star marked ₹500 notes Fake In India: स्टार चिन्ह असलेल्या 500 रुपयांच्या नोटा नकली असल्याचा व्हायरल दावा खोटा ठरला आहे. आरबीआयच्या माहितीनुसार या नोटा पूर्णपणे वैध असून चलनात स्वीकारल्या जातात. जाणून घ्या संपूर्ण सत्य.

Sandeep Chavan

बाजारात आता स्टारवाल्या नोटा आल्याचा दावा करण्यात आलाय...आणि या नोटा नकली असून, कुठेही चालत नाहीत...त्यामुळे तुमची फसवणूक होऊ शकते असा दावा केलाय...हा मेसेज आता व्हायरल होत असल्याने आम्ही याची पडताळणी सुरू केली...त्याआधी मेसेजमध्ये काय दावा केलाय पाहुयात...

स्टार असं चिन्ह असलेल्या 500 च्या नोटा बाजारात फिरू लागल्यायत. ही एक बनावट नोट आहे. एका ग्राहकाला अशा दोन-तीन नोटा मिळाल्या. बाजारात बनावट नोटा बाळगणाऱ्या लोकांची संख्या वाढलीय.

हा मेसेज व्हायरल होत असल्याने आम्ही याची पडताळणी सुरू केली...खरंच स्टार चिन्ह असलेल्या नोटा नकली आहेत का...? नोटांवर स्टार चिन्ह असल्यास ती बाजारात चालत नाही का...? असे अनेक प्रश्न उपस्थित झाले...त्यामुळे याची सत्यता जाणून घेण्यासाठी गूगलवर कीवर्डने शोध घेतला...आम्हाला भारतीय रिझर्व्ह बँकेच्या वेबसाईटवर काही माहिती मिळाली...तसंच याची अधिक माहिती मिळवण्यासाठी आम्ही बँकिंग तज्ज्ञांचा सल्ला घेतला...

स्टार चिन्ह असलेल्या नोटा नकली नाहीत

डिसेंबर 2016 मध्ये स्टार चिन्हाच्या नोटा जारी केल्या

10, 20, 50, 100 च्या स्टार नोटा आधीच चलनात

500 रुपयांच्या नोटा कायदेशीर चलनात राहतील

आरबीआयने 2016 साली काढलेल्या प्रेस नोटमध्ये या नोटांच्या दोन्ही अंक फलकांमध्ये 'E' हे अक्षर असेल असं सांगितलं...त्यावर आरबीआयचे गव्हर्नर डॉ. उर्जित आर. पटेल यांची स्वाक्षरी असेल. छपाईचे वर्ष '2016' असून नोटेच्या मागील बाजूस स्वच्छ भारतचा लोगो छापलेला आहे...अशी माहिती दिली...त्यामुळे आमच्या पडताळणीत स्टार चिन्ह असलेली नोट नकली असल्याचा दावा असत्य ठरलाय...

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai T20 League: टी-२० लीगमध्ये मराठा संघाची 'रॉयल' कामगिरी; सलग दुसऱ्यांदा जेपेतपदावर कब्जा

अनुसूचित जातीत उपवर्गीकरण करायला हरकत नाही; रामदास आठवलेंनी सांगितलं कारण, VIDEO

IND vs AFG: शुबमन गिलसमोर अफगाण गोलंदाजी फेल; टीम इंडियाचा पहिल्या वनडेत शानदार विजय

Yavatmal Crime: खासगी रुग्णालयात धारदार शस्त्राने हल्ला करत नर्सची हत्या; यवतमाळ हादरलं

वीज मीटर ४८ तासांत बदलणार; 'महावितरण'कडून ग्राहकांना अल्टिमेटम? काय आहे मेसेजमागचं सत्य?

SCROLL FOR NEXT