Viral Video Saam Tv
व्हायरल न्यूज

Viral Video : नाचताना इतका जोश चढला की काका कुणाचंही ऐकेना; VIDEO पाहून नेटकरी खवळले

Shocking Stunt Viral Video : सोशस मीडियावर दररोज अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात,त्यात आता एका काकांचा व्हिडिओ व्हायरल होत आहे,जिथे काका धोकादायक ठिकाणी रील बनवताना दिसून येतात.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

गेल्या काही महिन्यापासून रील बनवताना अनेकांना स्वत:चा जीव गमवावा लागला आहे. अनेकवेळा या थरारक क्षणाचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालेले होते. अनेकजणांना हे व्हिडिओ पाहून धोकादायक ठिकाणी रील काढणे टाळले असेल,परंतू काहीजण असं असूनही ऐकत नाही.सध्या सोशल मीडियावर याचाच असाच एक व्हिडिओ व्हायरल होत आहे,ज्यात एक व्यक्ती स्वता:चा जीव धोक्यात घालून रील बनवताना दिसून येत आहे.

व्हायरल व्हिडिओ

व्हायरल होत असलेला व्हिडिओ (Video)एका उंचावरील पाण्याच्या टाकीवरचा वाटत आहे. या पाण्याच्या टाकीवर एक काका सुरुवातीस अतिशय टोकाला बसलेले होते. रील बनवण्यास सुरुवात केल्यानंतर काका तेथून उठतात आणि वाकडातिकडा डान्स करायला लागतात. परंतू एका क्षणाला असे वाटते की काकांचा चुकूनही तोल गेला असता तर ते सरळ खाली पडले असते.

प्रतिक्रिया

सोशल मीडियावर फेमस होण्याच्या नादात अनेक व्यक्ती असे धोकादायक ठिकाणी रील बनवतात. अनेकदा असे स्टंट केल्याने असे व्यक्ती थोड्या कालावधीसाठी फेमस होतात,मात्र पुन्हा असे धोकादायक ठिकाणी जाऊन स्टंट(Stunt करण्याचे प्रमाण वाढत जाते.सध्या व्हायरल होत असलेला व्हिडिओतील काकांनी डान्स करण्यासाठी निवडलेले ठिकाण पाहून अनेकांनी डोक्याला हात लावलेला आहे शिवाय अनेक प्रतिक्रिया केलेल्या आहेत.त्यातील अनेक यूजर्सने कमेंटबॉक्समध्ये लिहिले आहे की,'संभाल के कही पाखरा हमेशा के लिये ना आजाद हो जाये' अशा अनेक प्रतिक्रिया केलेल्या आहेत.

व्हायरल होत असलेला व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'इन्स्टाग्रामवरील' ''@gadekar.kaka'' या अकाउटवर शेअर करण्यात आलेला आहे. 'पाखरा आझाद केलं तुला'असे एका गाण्याचे कडवे कॅप्शनमध्ये लिहिण्यात आलेले आहे.व्हिडिओला पाच दिवसांत ६ हजारापर्यंत नेटकरी वर्गातून लाईक्स मिळाले असून मोठ्या प्रमाणात व्ह्यूजही मिळाले आहेत.

पाहा व्हिडिओ

टीप : हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याची पडताळणी झालेली नाही. फक्त माहिती म्हणून आम्ही वाचक-प्रेक्षकांपर्यंत ही बाब पोहचवत आहोत. याचं आम्ही कोणत्याही प्रकारे समर्थन करत नाही

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pav Bhaji Recipe : मुंबई स्टाईल पावभाजी घरच्या घरी कशी बनवायची? सीक्रेट रेसिपी आताच लिहून घ्या

Maharashtra News Live Update: मुंबई-आग्रा महामार्गावरील चांदवड घाटात वाहतूक कोंडी

शरद पवारांची राष्ट्रवादी सत्तेत सामील होणार? मी तुम्हाला इतिहासात नेते म्हणत सुप्रिया सुळेंचा मोठा खुलासा

लाडक्या बायकोसाठी चांदीच्या जोडव्याचे 5 सुंदर डिझाईन्स

Nashik News: भावली धबधबा मारहाण प्रकरण, पर्यटकांना मारहाण करतानाचा नवा VIDEO समोर

SCROLL FOR NEXT