Spiderman-woman Couple Saam Digital
व्हायरल न्यूज

Spiderman-woman Viral Video : स्पायडरमॅन-स्पायडरवुमनला बाईकवरचे स्टंट पडले महागात; Video सोशल मीडियावर तुफान व्हायरल

Spiderman-woman Couple Stunts : दिल्लीतील एका एन्फ्लुएन्सर जोडप्याला इन्स्टाग्राम रीलसाठी केलेले स्टंट चांगलेच महागात पडले आहेत. वाहतूक नियमांचं उल्लंघन केल्याप्रकरणी पोलिसांनी या स्पायडरमॅन जोडप्याला कायदेशीर कारवाईला सामोरं जावं लागलं आहे.

Sandeep Gawade

दिल्लीतील एका एन्फ्लुएन्सर जोडप्याला इन्स्टाग्राम रीलसाठी केलेले स्टंट चांगलेच महागात पडले आहेत. वाहतूक नियमांचं उल्लंघन केल्याप्रकरणी पोलिसांनी या स्पायडरमॅन जोडप्याला कायदेशीर कारवाईला सामोरं जावं लागलं आहे. स्पायडरमॅन आणि स्पायडर-वुमनच्या वेषात, दक्षिण पश्चिम दिल्लीच्या द्वारकामधून हेल्मेट, आरसे किंवा दृश्यमान नंबर प्लेटशिवाय दुचाकीवर फिरकताना आणि स्टंट करताना या जोडप्याला पोलिसांनी अटक केली. सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

“स्पायडरमॅन नजफगढ पार्ट 5” शीर्षक असलेला हा व्हिडिओ नजफगढ येथील 20 वर्षीय आदित्यने त्याच्या इंस्टाग्राम अकाउंट 'इंडियन स्पाइडी ऑफिशियल' वर पोस्ट केलेल्या मालिकेचा भाग होता. 9,000 पेक्षा जास्त फॉलोअर्स असलेल्या या खात्यामध्ये स्पायडरमॅनच्या वेशभूषेत विविध स्टंट्स आणि अँटीक्स आहेत, ज्यामध्ये तो पुशकार्टमधून कांदे विकताना दिसतो. दिल्ली वाहतूक पोलिसांनी या जोडप्याला अटक केली आणि मोटार वाहन कायद्यांतर्गत दंडात्मक कारवाई केली आहे. नंतर या जोडप्याला जामिनावर सोडण्यात आल्याची माहिती आहे.

आदित्यचे संट पाहण्याची ही काही पहिलीच वेळ नाही. याआधीही त्याचे सुपरहिरोच्या वेश्यात स्टंट करतानाचे व्हिडीओ व्हायरल झाले आहेत. सोशल मीडियावर प्रसिद्धी मिळवण्यासाठी अलिकडे धोकादाय स्टंट करण्याकडे कल वाढला आहे. यातून काहींनी जीवही गमावल्याच्या घटना घडल्या आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ashadhi Ekadashi Marathi Wishes: पाऊले चालती पंढरीची वाट...आषाढी एकादशी निमित्ताने प्रियजनांना पाठवा 'हे' खास शुभेच्छा

Maharashtra Live News Update: सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी आज येलो अलर्ट जारी

Prataprao Jadhav : मुंबई गुजरातची राजधानी होती, शिंदे सेनेच्या प्रतापराव जाधवांचे वक्तव्य

Politics: 'छत्रपती संभाजी राजेंनी १६ भाषा शिकल्या, ते काय मु**'; शिंदे गटातील आमदाराची जीभ घसरली

Ashadhi Ekadashi: आज आषाढी-देवशयनी एकादशीला करा हे सोपे उपाय; जीवनातील समस्या होतील पटकन दूर

SCROLL FOR NEXT