Social Media Viral Video 
व्हायरल न्यूज

Viral News: महादेवाच्या मंदिरावर दर 12 वर्षांनी पडते वीज? व्हायरल व्हिडीओमागचं सत्य काय?

Social Media Viral Video: सोशल मीडियावर महादेवाच्या मंदिराचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. या मंदिरावर दर 12 वर्षांनी वीज कोसळतं असल्याचा दावा करण्यात आलाय.

Mayuresh Kadav

सोशल मीडियात एक व्हिडीओ वेगानं व्हायरल होतोय. या व्हिडीओत एका डोंगरावर अक्षरश: विजेचा लोळ पडतोय. या व्हिडीओसोबत एक मेसेजही व्हायरल होतोय. त्यात हा व्हिडीओ कुल्लूतला असल्याचा दावा करण्यात आलाय. इथल्या महादेवाच्या मंदिरावर दर 12 वर्षांनी वीज कोसळते आणि शिवलिंगाचे तुकडे तुकडे होतात असं सांगण्यात येतंय. व्हायरल व्हिडीओबाबत काय दावा करण्यात आलाय पाहा.

कुल्लूतल्या महादेवाच्या मंदिरावर दर 12 वर्षांनी वीज पडते. त्याचाच हा व्हिडीओ आहे. वीज पडल्यानंतर मंदिरातील शिवलिंगाचे तुकडे तुकडे होतात आणि त्यानंतर पुजारी हे तुकडे पुन्हा जोडतात. हे शिवलिंग पूर्वीसारखंचं होतं.

भारतात महादेवाचे लाखो भक्त आहेत. दरवर्षी हजारो भाविक वेगवेगळ्या ज्योतिर्लिंगांना भेट देऊन दर्शन घेतात. व्हायरल मेसेज हा थेट भाविकांच्या श्रद्धेशी निगडीत असल्यानं आम्ही याची सत्यता पडताळून पाहिली. आमच्या प्रतिनिधींनी या व्हिडीओ आणि मेसेजबाबत रिसर्च केला. तेव्हा काय सत्य समोर आलं पाहा.

सोशल मीडियात व्हायरल होत असलेला व्हिडीओ कुल्लूतला नाही. हा व्हिडीओ ग्वाटेमालातला आहे. ज्वालामुखीच्या उद्रेकानंतर हा व्हिडीओ शूट करण्यात आला होता. मात्र आता तो कुल्लूतला असल्याचं सांगून व्हायरल करण्यात येतोय. त्यामुळे व्हायरल व्हिडिओ कुल्लूमधील नसल्याचं स्पष्ट झालं. मात्र इथल्या महादेव मंदिराबाबत जो दावा करण्यात आलाय त्याचीही सत्यता आम्ही पडताळून पाहिली. याबाबत अधिक माहिती महंत देऊ शकतात त्यामुळे आम्ही त्यांच्यांशी संपर्क साधला तेव्हा त्यांनी काय सांगितलं पाहा.

हिमाचल प्रदेशातील कुल्लूमध्ये महादेवाचं प्राचीन मंदिर आहे. या मंदिराबद्दल एक आख्यायिका सांगितली जाते. राक्षसांचा विनाश करण्यासाठी इंद्रदेवाने विजेचं रूप धारण केलं. या विजेमुळे पृथ्वीवरील जीवांना, निसर्गाला धोका होऊ नये म्हणून महादेवानं त्या विजेला आपल्यात सामावून घेतलं. दर 12 वर्षांनी मंदिरावर वीज कोसळते, आणि शिवलिंगाचे तुकडे होतात. मंदिरातले पुजारी जंगलातील जडीबुटी, लोणी आणि अन्य लेपाच्या मिश्रणानं शिवलिंग पुन्हा जोडतात अशी धारणा आहे. मात्र गेल्या 15 ते 20 वर्षात अशा प्रकारची कोणतीही घटना समोर आलेली नाही.

त्यामुळे आमच्या पडताळणीत. महादेवाच्या मंदिरावर वीज पडल्याचा व्हिडीओ असत्य असल्याचं स्पष्ट झालंय. मात्र मंदिरावर दर 12 वर्षांनी वीज पडते ही एक आख्यायिका आहे. याबाबत कोणतेही सबळ पुरावे समोर आलेले नाहीत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Kunbi caste certificate : मोठी बातमी! कुणबी जातीचा दाखलाच रद्द; महिलेचं नगरसेवकपद गेलं, राज्याच्या राजकारणात खळबळ

Kombdi Vade Recipe : गटारी स्पेशल मेजवानी! मालवणी कोंबडी वड्यांची रेसिपी, चव अशी की घरचे बोटं चाटत राहतील

Abhijeet Dipke : अभिजित दिपके राजकीय पक्ष स्थापन करणार? पत्रकार परिषदेत स्पष्टच सांगितलं

Maharashtra News Live Update: जळगावात भीषण अपघात; टँकरच्या धडकेत भाजी विक्रेत्या महिलेचा मृत्यू, मुलगा जखमी

Lizard : या ५ ट्रिक्स वापरा; घरातील पाली होतील कायमच्या गायब!

SCROLL FOR NEXT