Snake in Fridge Video Saam TV
व्हायरल न्यूज

Snake in Fridge Video : घरातला फ्रिज उघडताच दिसला साप; फणा काढून बसला होता नागोबा, घटनेचा थरारक VIDEO

Snake Viral Video : घरातल्या फ्रिजमध्ये नागोबा बसल्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय. घरात साप बघितला तर तुमची तारांबळ उडल्याशिवाय राहणार नाही.

Yogesh Gaikwad

सोशल मीडियावर सापाचे अनेक व्हिडिओ तुम्ही पाहिले असतीलच. साप जिथे जागा दिसेल तिथे पोहोचतो. पावसाळ्यात साप अडगळीच्या ठिकाणी जातात आणि सर्प मित्र त्यांना पकडून नैसर्गिक अधिवासात सोडतात, असे व्हिडीओ तुम्ही पाहिले असतीलच. आता आम्ही तुम्हाला असा एक व्हिडिओ दाखवणार आहोत की तुम्ही थक्क व्हाल.

प्रत्येक व्यक्ती घरात सुरक्षित असतोच असं नाही. कारण कधी कोणती घटना घडून येईल सांगता येत नाही. घरातल्या फ्रिजमध्ये नागोबा बसल्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय. घरात साप बघितला तर तुमची तारांबळ उडल्याशिवाय राहणार नाही. असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता चक्क किंग कोब्रा फ्रिजच्या पाठीमागच्या जाळीत लपून बसला दिसत आहे.

कधी साप गाडीच्या डिक्कीत बसतात, कधी साप टायरमध्ये तर बोनेटमध्ये पाहिले असतील. पण या व्हिडिओत भला मोठा किंग कोब्रा फ्रिजमध्ये दिसला आहे. या सापाला बाहेर काढण्यासाठी शर्तीचे प्रयत्न केले आणि सपाला सर्प मित्राच्या मदतीने पकडण्यात आले. पण साप फणा उगारत असल्याचं व्हिडिओमध्ये दिसत आहे. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय.

@sarpmitra.akashjadhav25 या इंस्टाग्राम अकाउंटवर हा व्हिडिओ पोस्ट करण्यात आला आहे. सध्या या व्हिडिओची सोशल मीडियावर तुफान चर्चा रंगली आहे. नेटकऱ्यांनी व्हिडिओवर लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे. सापापासून सावधान राहा. सर्प मित्र फार चांगलं काम करत आहेत, अशा विविध कमेंट या व्हिडिओला आल्यात.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : पुण्यातील रिंग रोड आणि महामार्गांना अजित पवारांचे नाव द्या,रोहित पवारांची मागणी

Success Story: कॅन्सर-पॅरेलिसिसला हरवले, ४ सर्जरीनंतरही हरला नाही, ३८व्या वर्षी UPSCत यश; संजय डहरिया यांचा प्रवास

Iran Israel Conflict : इराणच्या एका क्षेपणास्त्रात ८० बॉम्ब, इस्रायलवर मोठा प्रहार, क्लस्टर बॉम्ब नेमका काय आहे?

Zumba: वजन कमी करण्यासाठी झुंबा खरचं फायदेशीर आहे का?

SSC Exam : बोर्डाच्या कॉपीमुक्त परीक्षा मिशनचा फज्जा, दहावीचा पेपर ३ दिवस आधीच फोडला

SCROLL FOR NEXT