Shocking Video Saam Tv
व्हायरल न्यूज

Shocking Video: बापरे! ट्रकचालकाचं नियंत्रण सुटलं अन् महिला थोडक्यात वाचली; सीसीटीव्हीत कैद झाला थरार

Kerala Viral Video: सोशल मीडियावर सध्या केरळमधील एक व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे. व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये एक भयानक अपघात घडला आहे. नक्की कसा अपघात घडतो ते पाहा.

Tanvi Pol

Kozhikode Truck Accident: केरळमधील कोझिकोड शहरातून एक अंगावर शहारे आणणारी घटना समोर आली आहे. भरधाव वेगात असलेल्या एका ट्रकने रस्त्यावर अचानक नियंत्रण गमावले आणि रस्त्यावरून चालत असलेल्या एका महिलेकडे थेट झेपावला. परंतू, त्या महिलेनं प्रसंगावधान राखत वेळेवर बाजूला होऊन आपला जीव वाचवला.

दृश्य पाहून अंगावर शहारे

घटनेचा व्हिडिओ(Video) पाहिल्यानंतर कोणीही हादरून जाईल. सीसीटीव्ही व्हिडिओमध्ये दिसते की, एक महिला नेहमीप्रमाणे रस्त्यावरुन स्कुटीवरुन जात होती. त्याच वेळी तिच्या पुढे ही एक ट्रक जात असतो. पण अचानक ट्रकचालकाचं ट्रकवरील नियंत्रण सुटते आणि तो ट्रक पाठी स्कुटीवर असलेल्या महिलेच्या दिशेने झेपावतो. क्षणाचा विलंब न करता महिला अतिशय चपळाईने स्कुटी मागे सारत उडी मारते. त्यामुळे काही इंचांनी तिचा जीव वाचला जातो आणि तो ट्रक महिलेच्या स्कुटीला चिरडत एका भिंतीवर आदळून थांबला जातो.

ही घटना परिसरातील सीसीटीव्ही (CCTV) कॅमेऱ्यात स्पष्टपणे कैद झाली आहे. सध्या हा व्हिडिओ समाज माध्यमांवर वाऱ्याच्या वेगाने व्हायरल झालेला असून तो, एक्सवरील @Kamlesh_ojha1या पेजवर अपलोड केलेला आहे. ऐवढेच नाही तर इन्स्टाग्राम, फेसबूकवर देखील व्हायरल होत आहेत.

नेटिझन्सची भावना

या व्हिडिओवर सोशल मीडियावर प्रचंड प्रतिक्रिया उमटल्या आहेत. त्यातील एका यूजरने कमेंट केली आहे,''नक्कीच महिलेच्या चांगल्या कामाचे परिणाम आहे हे, म्हणून बचावली'' तर दुसऱ्या यूजरने कमेंट केली,''हे पाहून समजले कधीही काही होऊ शकतो'' तिसऱ्या यूजरने कमेंट केली,''काही सेंकदाने महिलेला नवीन जीवनदान मिळाले'' अशा प्रकारे प्रतिक्रिया आलेल्या आहेत.

टीप: अपघाताचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याची पडताळणी झालेली नाही. फक्त माहिती म्हणून आम्ही वाचक-प्रेक्षकांपर्यंत ही बाब पोहचवत आहोत. याचं आम्ही कोणत्याही प्रकारे समर्थन करत नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

BMC Recruitment: बृहन्मुंबई महानरपालिकेत नोकरीची संधी; या पदांसाठी भरती सुरु; अर्ज कसा करावा?

Mandarmani Beach : पर्यटकांना भुरळ घालणारा मंदारमणी बीच, पावसाळ्यात खुलते सौंदर्य

Amruta Dhongade: अमृताचा बोल्डनेस पाहून तुम्हालाही भरेल हुडहुडी

Param Sundari vs Baaghi 4 : सिद्धार्थ मल्होत्रा अन् टायगर श्रॉफमध्ये कांटे की टक्कर, 'बागी ४'नं ओपनिंग डेलाच केली बक्कळ कमाई

Anant Chaturdashi 2025 live updates : मुंबईच्या राजाची विसर्जन मिरवणूक सुरु

SCROLL FOR NEXT