Pahalgam Attack Video Saam Tv
व्हायरल न्यूज

Pahalgam Attack Video: पहलगाममध्ये दहशतवादी हल्ला! पर्यटकांची पळापळ; थरारक व्हिडिओ समोर

Shocking Video: सोशल मीडियावर सध्या पहलगाम दहशतवादी हल्ल्याची चर्चा होत आहे. त्याच नुकताच तिथे झालेल्या हल्ल्याचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. व्हिडिओ पाहिल्यानंतर प्रत्येकाच्या अंगाचा थरकाप उडाला आहे.

Tanvi Pol

Pahalgam Attack Video: जम्मू-काश्मीरमधील प्रसिद्ध पर्यटनस्थळ असलेल्या पहलगाममध्ये झालेला दहशतवादी हल्लाने संपूर्ण देश हादरवून गेला आहे. या घटनेचा एक थरारक व्हिडिओ सध्या समोर आला असून, त्यामध्ये त्या क्षणाचे भयाण वास्तव स्पष्टपणे पाहायला मिळत आहे.

थरकाप उडवणारा व्हिडिओ व्हायरल

व्हायरल (Viral) होत असलेल्या या व्हिडिओमध्ये गोळबार सुरू झाल्यानंतर पर्यटक आणि स्थानिक नागरिक घाबरून कशी पळापळ करत आहेत. तेथिल सर्व दृश्य व्हिडिओमध्ये स्पष्टपणे दिसत आहे. धक्कादायक म्हणजे, सैनिकी वेषातील दहशतवाद्यांनी अचानक गोळ्या झाडल्यामुळे सगळीकडे गोंधळ उडाला होता. भयभीत वातावरणात काही पर्यटकांनी झाडांच्या आड लपण्याचा प्रयत्न केला, तर काहींनी खाली वाकुन जीव वाचवला.

पर्यटनस्थळी भीतीचे सावट

घडलेल्या घटनेनंतर संपूर्ण ठिकाणी भीतीचे सावट पसरले आहे. सध्या या घटनेचा (Incident) व्हिडिओ युट्युबवरील saamtv या अकाउंटवर अपलोड करण्यात आलेला आहे. व्हिडिओ पाहिल्यानंतर प्रत्येकजण भयभीत झाला आहे तर काहींनी सर्व दृश्य पाहून अश्रु अनावर झालेले आहेत. कमेंटबॉक्समध्ये दिलेल्या अनेक प्रतिक्रिया दिलेल्या आहेत. त्यात काहींनी घडलेल्या घटनेविरुद्ध हैराणजनक प्रतिक्रिया दिलेल्या आहेत.

सुरक्षा यंत्रणा सज्ज

पहलगाम दहशतवाद्यांच्या हल्ल्यानंतर संपूर्ण परिसर सील करण्यात आला आहे. राष्ट्रीय रायफल्स आणि जम्मू-काश्मीर पोलीस आणि केंद्रीय राखीव पोलीस दल यांचे जवान संयुक्तरित्या शोधमोहीम राबवत आहेत. विशेष म्हणजे या हल्ल्यामागे कोण आहे याचा तपास सुरू आहे.

टीप: हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याची पडताळणी झालेली नाही. फक्त माहिती म्हणून आम्ही वाचक-प्रेक्षकांपर्यंत ही बाब पोहचवत आहोत. याचं आम्ही कोणत्याही प्रकारे समर्थन करत नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

कोडिंगच्या जोरावर PMPMLचं बनावट ॲप! फुकट प्रवासासाठी 20 वर्षीय विद्यार्थ्याचा प्रताप उघड

Maharashtra News Live Update: नागपूर RTO च्या परमिट विभागातील कथित अनियमिततेवरून मनसे आक्रमक

गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीचं बिगुल वाजलं; मतदान आणि मतमोजणी कधी? जाणून घ्या

Bridal Beauty Kit: लग्नानंतर नव्या नवरीच्या बॅगेत असायलाच हव्यात 'या' ७ गोष्टी, कधीही ठरतील फायदेशीर

Cabinet Meeting: दिल्ली-मुंबई-कोलकाता-चेन्नई कनेक्टिव्हिटीला बूस्ट; 7 हाय-डेन्सिटी कॉरिडॉरचा होणार विस्तार, रेल्वे नेटवर्कमध्ये मोठा बदल!

SCROLL FOR NEXT