Viral Video Saam Tv
व्हायरल न्यूज

Viral Video: धक्कादायक! तरुणीवर ८-१० भटक्या कुत्र्यांचा हल्ला, मदतीसाठी किंचाळत राहिली; VIDEO पाहून हादरुन जाल

Viral video Of Stray Dog Attack: सध्या राजस्थानमध्ये घडलेल्या एका धक्कादायक घटनेचा व्हिडिओ व्हायरल होत आहे.व्हायरल होत असलेल्या व्हिडिओत जे घडले ते पाहिल्यानंतर तुम्हीही अतिशय हादरुन जाल.

Tanvi Pol

Rajasthan Dog Attack Video:प्रत्येक शहरात भटक्या कु्त्र्यांचा उपद्रव दिवसेंदिवस वाढत असताना दिसून येत आहे. अनेक ठिकाणी नागरिक भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्याला बळीही पडत आहेत,आणि त्यात सध्या अशाच एका धक्कादायक घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.या व्हिडिओमध्ये एका तरुणीवर एका नाही तर तब्बल ८ ते १० भटक्या कुत्र्यांनी अचानक हल्ला केलेला आहे.सर्व धक्कादायक प्रकार पाहून तुमच्याही अंगावर काटा येईल.

व्हायरल(Viral) होत असलेली संपूर्ण घटना राजस्थान येथील अलवरमधील आहे.जिथे सीसीटीव्ही व्हिडिओमध्ये तुम्हाला एका घराबाहेर तरुणी दिसत असून ती मोबाईलवर बोलत असताना दिसते. घराबाहेर पडत असताना अचानक एका बाजूने तब्बल ८ ते १० भटकी कुत्री येतात आणि अचानक तरुणीवर हल्ला चढवतात.

त्यानंतर तरुणी स्वता:च्या बचावचा प्रयत्न करतानाही दिसत आहे.व्हिडिओत तुम्हाला तरुणी जीवाची बाजी लावून कुत्र्यपासून सुटकेचा प्रयत्न करत असते मात्र त्याच वेळी तेथून एक महिला गाडीवरुन जात असते आणि तरुणीला पाहिल्यानंतर महिला थांबते.मग महिला तिच्याकडे असलेल्या एका साधनाने कुत्र्यांना तेथून पळून लावते.सर्व धक्कादायक प्रकार घराबाहेर असलेल्या सीसीटीव्हीमध्ये कैद झालेला आहे.

राजस्थानमधील हा व्हिडिओ पाहिल्यानंतर प्रत्येक नागरिक संतप्त झाला आहे.गेल्या काही वर्षांपासून शहरातील भटक्या कुत्र्यांचा प्रश्न अतिशय गंभीर होत चालला आहे.त्यावर प्रशासनाने तातडीने पावले उचलावी,अशी मागणी वारंवार नागरिकांकडून केली जाते.मात्र अशा घटना थांबण्याचे नाव घेत नाही.

व्हिडिओ(Video) पाहिल्यानंतर प्रत्येकजण हादरुन गेलेला आहे.तर त्यातील काही लोकांनी विविध प्रतिक्रियाही केलेल्या आहेत.मग एका यूजरने कमेंट केली,''रस्त्यावर फिरताना सावध राहा'' तर दुसऱ्या यूजरने कमेंट केली आहे,''भटक्या कुत्र्यांच्या जवळ जाणे टाळा''तर काहींनी त्या महिलेच्या धाडसाचे कौतुक केले आहे,अशा अनेक प्रतिक्रिया आलेल्या आहेत.

टीप: राजस्थानमधील हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याची पडताळणी झालेली नाही. फक्त माहिती म्हणून आम्ही वाचक-प्रेक्षकांपर्यंत ही बाब पोहचवत आहोत. याचं आम्ही कोणत्याही प्रकारे समर्थन करत नाही

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Golden Man Crime : पुण्यासारखं पनवेलमध्येही गँगवॉर, गोल्डमॅन अन् म्हात्रे भिडले, १४ आरोपींवर गुन्हा, वाचा नेमकं प्रकरण

Ladki Bahin Yojana: लाडकीसाठी खुशखबर, ऑगस्टचे ₹१५०० खात्यात खटाखट येणार, सरकारने उचलले मोठं पाऊल

Maharashtra Live News Update : नागपूर विभागात पाच भागात असणार वीजपुरवठा बंद

Lalbaugcha Raja: मुंबईतील लालबागचा राजा मंडळात गरबा होणार; गणेश मंडळ उद्योगपतींकडून हॅकजॅक, मनसेचा आरोप

Thane crime : ठाण्यात गुंडांची दहशत, प्रसिद्ध डॉक्टरांच्या दवाखान्याची तोडफोड, व्हिडिओ समोर

SCROLL FOR NEXT