Viral Video Saam Tv
व्हायरल न्यूज

Viral Video: फालतुगिरीचा कळस! गटाराच्या पाण्याचा सरबत केला अन् प्यायला, व्हिडीओ पाहून शिव्याच द्याल!

Shocking Viral: सोशल मीडियावर सध्या एका तरुणाचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. ज्यात तरुणाने रिल्सवर प्रसिद्धी मिळवण्यासाठी घाणीच्या पाण्यातून तयार केलेला सरबत प्यायला आहे.

Tanvi Pol

Young Man Viral Video: सोशल मीडियावर प्रसिद्धी मिळवणे सध्या तरुणांच्या डोक्यातील खूळ बनलं आहे. मग या प्रसिद्धीच्या नादात तरुण असो वा अनेकजण काहीही करण्यासाठी तयार होतात. मग त्यात जीव गेला तरी त्यांना भिती वाटत नाही. सध्या अशाच एका तरुणाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यात तो नक्की काय करतो आणि तो व्हिडिओ व्हिडिओ नेटकऱ्यांनी अक्षरशा: संताप व्यक्त केलेला आहे.

व्हायरल(Viral) होत असलेल्या व्हिडिओत तुम्हाला एक तरुण दिसत आहे. जो गटारीच्या पाण्याच्या बाजूला बसलेला आहे. तरुणाच्या बाजूला तुम्हाला एक प्लेट ही दिसत आहे ज्यात काही लिंबू आणि ग्लास आहेत. मात्र काही वेळात तरुण एक लिंबू कापतो आणि त्या ग्लासात टाकतो आणि गटारीतील पाणी पण त्यात टाकतो आणि सर्व घाणेरड पाणी लिंबू सरबत म्हणून पितो. सर्व व्हिडिओ(Video) त्याच्या सोबत असलेल्या व्यक्तीने मोबाईमध्ये कैद केलेला आहे.

तरुणाचा व्हिडिओ इन्स्टाग्रामवरील ''@room_pe_chle'' या अकाउंटवर पोस्ट करण्यात आलेला आहे. व्हिडिओ पोस्ट करुन सात दिवस होताच काही वेळात व्हिडिओला लाखोच्या संख्येने व्ह्यूज आणि लाईक्स मिळाले आहे. एवढेच नाही तर अनेकांनी संतापजनक प्रतिक्रियाही केलेल्या आहेत. त्यातील एका यूजरने लिहिले आहे की,'' यांना धरून हाणल पाहिजे'' तर दुसऱ्या एका यूजरने लिहिले आहे की,'' काय म्हणाव आता'' तर अशा अनेक प्रतिक्रियाही व्यक्त केलेल्या आहेत.

टीप : हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याची पडताळणी झालेली नाही. फक्त माहिती म्हणून आम्ही वाचक-प्रेक्षकांपर्यंत ही बाब पोहचवत आहोत. याचं आम्ही कोणत्याही प्रकारे समर्थन करत नाही.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election : खोटी माहिती, व्हिडिओ, बातम्या शेअर करताना सावधान; अन्यथा...

Complaint Against Jayant Patil: मोठी बातमी! जयंत पाटील यांच्याविरोधात काँग्रेसची निवडणूक आयोगात तक्रार; काय आहे प्रकरण? वाचा...

NEET मध्ये मोठ्या बदलांची तयारी; परीक्षा एकापेक्षा जास्त टप्प्यात अन् अटेम्पट होतील मर्यादित

Raver Vidhan Sabha : तृतीयपंथीयाचे विधानसभा निवडणूकीच्या रिंगणात पहिलं 'पाऊल'; रावेर मतदारसंघातून उमेदवारी

Coconut Water: नारळ पाणी सोबत 'हे' पदार्थ चुकूनही खावू नये?

SCROLL FOR NEXT