Viral Video Saam Tv
व्हायरल न्यूज

Viral Video: घराबाहेर बिबट्याचा कुत्र्यावर हल्ला; घटनेचा थरारक VIDEO समोर

Shocking Viral Video: सोशल मीडियावर पुन्हा एकदा बिबट्याचा पाळीव कुत्र्यावर हल्ल्याचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. सर्व घटना घराबाहेरील सीसीटीव्हीमध्ये कैद झाली असून प्रत्येकाच्या चर्चेत व्हिडिओ आला.

Tanvi Pol

Viral Video: पुण्याच्या मंचर येथे बिबट्याने कुत्र्यावर हल्ला केला अन दोघांमध्ये चांगलीच झटापटही झाली पण हम भी किसीसे कम नही हे दाखवत कुत्र्याने बिबट्याला पळवुन लावला बिबट्या आणि कुत्र्याच्या हल्ल्याचा थरार सीसीटिव्ही मध्ये कैद झालाय. सध्या सर्व घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

'हर कुत्ते का दिन आता है' या हिंदीतील म्हणीचा प्रत्यय नुकताच मंचर येथे आला असून मंचर येथे चक्क कुत्र्याने(Dog) बिबट्याला पळवून लावल्याची घटना घडलीय मंचर शहरातील जुन्या चांडोली रोडवर निलेश कोकणे यांच्या बंगल्याच्या आवारात असलेल्या पामोलियान जातीच्या कुत्र्यावर बिबट्याने हल्ला केला.

कंपाऊंड वरून उडी मारून आत आलेल्या बिबट्याचा या छोट्या कुत्र्याने जोरदार प्रतिकार करत आरडाओरडा केला. कुत्र्याच्या ओरडण्याने जागे झालेल्या निलेश कोकणे यांनी बाहेरील लाईट लावल्यानंतर बिबट्या पळून गेला. मात्र या हल्ल्यात कोकणे यांचा कुत्रा जखमी झाला आहे.

व्हायरल होत असलेला व्हिडिओ सध्या एक्स या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर व्हायरल होत असून तो व्हिडिओ एक्सवरील ''saamtvnews'' या अकाउंटवर पोस्ट करण्यात आलेला आहे. व्हिडिओ व्हायरल होताच असंख्य लाईक्स व्हिडिओला मिळाले आहे तर अनेक व्ह्यूजही व्हिडिओला येत आहे.

टीप : पुणे मधील व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याची पडताळणी झालेली नाही. फक्त माहिती म्हणून आम्ही वाचक-प्रेक्षकांपर्यंत ही बाब पोहचवत आहोत. याचं आम्ही कोणत्याही प्रकारे समर्थन करत नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

देशावर येणार अस्मानी संकट; ऑक्टोबर ते डिसेंबरदरम्यान तीन महाभयानक वादळं धडकणार

Hartalika Vrat Niyam: हरतालिका व्रतात काय खावे आणि काय टाळावे? तुम्हाला माहितीये का?

Weight Gain Reasons: डाएट आणि एक्सरसाइज करूनही वजन वाढतंय? 'या' ७ चुका तुमचा प्रयत्न करू शकतात फेल

Central Railway News : दुष्काळात तेरावा महिना! मेगा ब्लॉक सुटल्यानंतर मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत, लोकल सेवा ४५ मिनिटे उशिराने

Maharashtra News Live Update: Mumbai: पुण्यात मराठा बिझनेस कम्युनिटीचा इंटरनॅशनल बिझनेस एक्सपो

SCROLL FOR NEXT