Snake Viral Video Saam Tv
व्हायरल न्यूज

Viral Video: बेडवर आढळला भलामोठा साप; अंगावर सर्रकन काटा आणणारा VIDEO पाहा

Viral Video: सोशल मीडियावर कायम अनेक प्राण्यांचे व्हिडिओ व्हायरल होतात. यातील काही व्हिडिओ अंगाचा थरकाप उडवणारे असतात.अशातच सोशल मीडियावर एका भल्या मोठ्या सापाचा व्हिडिओ व्हायरल होत आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

सोशल मीडियावर कधी कोणती गोष्ट सहज व्हायरल होईल काही सांगता येणार नाही. मात्र आता सोशल मीडियावर असाच एक व्हिडिओ व्हायरल होतोय जो व्हिडिओ पाहिल्यानंतर तुमच्या अंगाचा थरकाप उडेल. व्हायरल होत असलेल्या व्हिडिओ चक्क एक भला मोठा साप बेडरुममधल्या पंलगावर पळताना दिसत आहे. सध्या सोशल मीडियावर हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय.

आपल्या घरात साधी पाल जरी आपल्याला दिसली की अंगाचा थरकाप उडतो. मात्र जर तुमच्या विश्रांती घेण्याच्या ठिकाणी असा भला मोठा साप दिसला तर प्रत्येकाची कायमची झोप उडल्याशिवाय राहणार नाही.सोशल मीडियावर याआधीही घरात साप आढळल्याच्या अनेक घटना असतील व्हिडिओ समोर आले आहेत मात्र सध्या व्हायरल होत असलेल्या व्हिडिओची (Video)खूप चर्चा होतेय.

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओत आपल्याला बेडरुमची खोली दिसून येत आहे. यात खोलीत एक बेडही आहे. मात्र जर तुम्ही व्हिडिओ नीट पाहिला असता त्यामध्ये एक भला मोठा साप (-snake)दिसून येत आहे. हा साप बेडजवळ लावलेल्या चार्गिच्या वायरला पकडले आहे. याच वायरला पकडलेले असता तो वळवळत आहे. त्यानंतर हा साप बेडमध्ये असलेल्या चादरमध्ये जाताना दिसून येतो.

व्हायरल होत असलेला व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रावरील @peddlermedia या अकाऊंटवर शेअर करण्यात आलेला आहे. पंरतू सापाचा थरारक व्हिडिओ कुठल्या शहरातील आहे हे समजू शकलेले नाही. व्हिडिओ व्हायरल होताच नेटकऱ्यांनी विविध प्रतिक्रिया दिलेल्या आहेत. त्यातील एका यूजर्न कमेंट बॉक्समध्ये लिहिले आहे की,' बाबो! आता आपण घरातही सुरक्षित नाही.' तर आणखी एका यूजरने लिहिले आहे की,' काही होणार नाही हा साप चावणार नाही.' तर तिसऱ्या यूजर्सने लिहिले आहे,'नशीब तिथे कोणी झोपलेले असताना साप आला नाही'.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics: मोठी बातमी! ठाकरेंचा दिग्गज नेता आणि नगरसेवकाविरोधात गुन्हा, राजकीय वर्तुळात खळबळ

Maharashtra News Live Update: सोयाबीनचे बियाणे विक्री करणाऱ्या 'बूस्टर' कंपनीविरोधात अमरावतीत गुन्हा

SET Exam Update : विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी! SET परीक्षा पुढे ढकलली, नेमकं कारण काय? कधी होणार परीक्षा? वाचा A to Z अपडेट्स

Sindhudurg Tourism : मालदीव विसरा! महाराष्ट्रातच आहे 'हा' निसर्गरम्य समुद्रकिनारा, पावसाळ्यात दिसतं आरशासारखं निळेशार पाणी

Salman Khan : सलमान खानने विकले मुंबईतील आलिशान घर; किती कोटींमध्ये झाली डील, आकडा पाहून व्हाल चकित

SCROLL FOR NEXT