Viral Video Saam Tv
व्हायरल न्यूज

Viral Video: उल्हासनगरात पाण्याचा फुगा ठरला वादाचे कारण,तरुणांमध्ये बेदम मारहाण; VIDEO व्हायरल

Shocking Viral Video: सोशल मीडियावर सध्या उल्हासनगरमधील घडलेल्या एका घटनेचा व्हिडिओ व्हायरल होत आहे.नक्की काय घडले ते पाहण्यासाठी व्हायरल होत असलेला व्हिडिओ एकदा पाहाच.

Tanvi Pol

Ulhasnagar News: उल्हासनगरच्या कॅम्प ५ मधील गणेश नगरमध्ये अंगावर फुगा मारल्याच्या रागातून तुफान राडा झाला. यात ७ ते ८ जणांच्या टोळीने थेट दुकानात घुसून दोन जणांना बेदम मारहाण केलीय. ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालीय.

हल्ल्यात इर्शाद अली आणि अब्दुल हकीम हे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार (Treatment)सुरू आहेत. इर्शाद अली याचा गणेश नगरमध्ये जीन्स कारखाना असून याठिकाणी रस्त्यावर काही अल्पवयीन मुलं फुगे मारत होते.

या वादातून या दोघांचा त्यांच्याशी वाद झाला आणि या टोळक्याने थेट दुकानात घुसून इर्षाद आणि अब्दुल हकीमवर हल्ला चढवत त्यांना बेदम मारहाण(Fight) केली. याप्रकरणी सध्या हिललाईन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून पोलीस अधिक तपास करत आहेत.

उल्हासनगरमधील व्हिडिओ सध्या इन्स्टाग्राम या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर व्हायरल होत आहे.व्हिडिओ saamtvnew या अकाउंटवर अपलोड करण्यात आलेला असून व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये,''पाण्याचा फुगा मारताच तुफान राडा''असे लिहिण्यात आलेले आहे.याआधीही उल्हानगरमधील घडलेल्या अनेक अशा घटनांचे व्हिडिओ व्हायरल झालेले आहेत.

टीप : हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याची पडताळणी झालेली नाही. फक्त माहिती म्हणून आम्ही वाचक-प्रेक्षकांपर्यंत ही बाब पोहचवत आहोत. याचं आम्ही कोणत्याही प्रकारे समर्थन करत नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Kombdi Vade Recipe : गटारी स्पेशल मेजवानी! मालवणी कोंबडी वड्यांची रेसिपी, चव अशी की घरचे बोटं चाटत राहतील

Abhijeet Dipke : अभिजित दिपके राजकीय पक्ष स्थापन करणार? पत्रकार परिषदेत स्पष्टच सांगितलं

Maharashtra News Live Update: जळगावात भीषण अपघात; टँकरच्या धडकेत भाजी विक्रेत्या महिलेचा मृत्यू, मुलगा जखमी

Lizard : या ५ ट्रिक्स वापरा; घरातील पाली होतील कायमच्या गायब!

Police Transfer : पोलिस दलात मोठा फेरबदल, ३९ पोलिसांची तडकाफडकी बदली; नावं अन् धक्कादायक कारण समोर

SCROLL FOR NEXT