Viral Video Saam Tv
व्हायरल न्यूज

Viral Video: घाणेरडेपणा! नाल्यात पोते बुडवले अन् नंतर फळांवर टाकले; फळं विक्रेत्याच्या घृणास्पद कृत्याचा VIDEO व्हायरल

Shocking Viral Video: सोशल मीडियावर सध्या फळं आवडीने फळं खाणाऱ्यांसाठी एक व्हिडिओ व्हायरल झालेला आहे. ज्यात एक फळ विक्रेता फळ ताजी ठेवण्यासाठी चक्क काय करतो ते दाखवलेले आहे.

Tanvi Pol

Chhatrapati Sambhaji Nagar: आपल्यापैंकी प्रत्येकजण चांगल्या आरोग्यासाठी विविध फळं खातो.आजारी व्यक्तींना हमखास प्रत्येकजण फळे खाण्याचा सल्ला देतात.मात्र सध्याचा व्हायरल व्हिडिओ पाहून फळं खावीत की नाही,असा मोठा प्रश्न पडलेला आहे.सोशल मीडियावर सध्या छत्रपती संभाजीनगरमधील फळविक्रेत्याचा किळसवाणा व्हिडीओ व्हायरल झालेला आहे,ज्यात नाल्यात पोते बुडवून तेच पोते केळीवर टाकल्याचा धक्कादायक प्रकार घडलेला आहे.

शहर असो वा प्रत्येक ठिकाणांतील अनेक नागरिक रस्त्यावर असलेल्या गाड्यांवरुन पालेभाज्या आणि फळं विकत घेत असतात.मात्र त्यातील अनेकजण खाण्याचे पदार्थ विकत घेताना पूर्णपणे हायजीनकडे लक्ष देत,बाजारातील जे व्यावसायिक स्वच्छेतेकडे लक्ष देतात त्यांच्याकडून भाजीपाला विकत घेतात.मात्र असे असून ही अनेक विक्रेते कोणत्याही स्वच्छेतेकडे लक्ष देत नाही.सध्याचा व्हायरल होत असलेला व्हिडिओही(Video) या संबंधि आहे जो पाहून प्रत्येकजण संपापले आहेत.

सध्याचा व्हायरल होत असलेला व्हिडिओ छत्रपती संभाजीनगर शहरामधील आहे.व्हायरल होत असलेल्या व्हिडिओत तुम्हाला दिसेल की, एक फळ विक्रेता नाल्यातील पाण्यात पोते बुडवत असल्याचे दिसत आहे.काही वेळानंतर तो विक्रेता ते पोते घेऊन फळं असलेल्या ठिकाणी जातो आणि त्या फळांवर ठेवतो.सर्व धक्कादायक प्रकार तिथे असलेल्या एका नागरिकाने मोबाईमध्ये कैद केलेला आहे.

फळ(/fruit) विक्रेत्याच्या व्हिडिओमुळे संताप व्यक्त केला जातोय. फळ आणि भाजी विक्रेते फळे आणि भाज्या दिवसभर हिरव्या राहण्यासाठी आणि ओले ठेवण्यासाठी कोणत्याही घाण पाण्याचा वापर करीत असल्यामुळं आरोग्याला धोका निर्माण होऊ शकतो. यापूर्वी छत्रपती संभाजीनगर शहरातील टीव्ही सेंटर येथे असाच एक व्हिडिओ समोर आला होता. त्यावर कारवाई झाली होती. आता हा संताप जनक व्हिडिओ समोर आल्यानंतर काय कारवाई होते का आणि तो फळ विक्रेता नेमका कोण आहे हे शोधलं जातं का ते पाहावं लागेल.

टीप : हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याची पडताळणी झालेली नाही. फक्त माहिती म्हणून आम्ही वाचक-प्रेक्षकांपर्यंत ही बाब पोहचवत आहोत. याचं आम्ही कोणत्याही प्रकारे समर्थन करत नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra politics : १९ वर्षांनंतर राज-उद्धव ठाकरे एका मंचावर, भुजबळांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले दूर का गेले ते...

Crime: मेहुण्याच्या प्रेमात झाली वेडी, जगात येण्यापूर्वीच बाळाला संपवलं अन् कचऱ्यात फेकलं

Marathi Vijay Melava: ठाकरे बंधूंच्या मेळाव्यासाठी वरळी डोमबाहेर मराठी जनसागर|VIDEO

Methi Ladoo: लहान मुलं मेथीचे लाडू खायला नकार देतात? मग 'ही' ट्रिक वापरा आणि पाहा जादू!

Bluetooth Security: ब्लूटूथ हेडफोन, इअरबड्स वापरणाऱ्या मोठा धोका, सरकारने जारी केला इशारा

SCROLL FOR NEXT