Shocking Video Saam Tv
व्हायरल न्यूज

Shocking Video: भयंकर घटना! तुटलेल्या पुलावरुन जाण्याचा प्रयत्न जीवावर बेतला; माय-लेकीचा व्हिडिओ पाहून अंगावर येतील शहारे

Shocking Viral Video: सोशल मीडियावर सध्या एका भयंकर अपघाताचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. जिथे महिला आणि तिची लहान मुलगी पुल पार करत होती. मात्र तेवढ्यात असं काही घडलं ते पाहून प्रत्येक घाबरलेला आहे.

Tanvi Pol

तुटलेल्या पुलावरुन जाण्याचा प्रयत्न एका माय-लेकीच्या जीवावर बेतण्याची वेळ आली. प्रवाह प्रचंड असूनही त्यांनी पुल पार करण्याचा प्रयत्न केला. या थरारक क्षणाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून नागरिकांनी अशा धाडसाच्या निषेधार्थ चिंता व्यक्त केली आहे.

तुटलेल्या पुलातून जाण्याचा प्रयत्न जीवावर बेतला

या व्हिडिओमध्ये दिसतं की गावात मोठ्या प्रमाणात पाऊस पडल्याने सर्वत्र पुराची परिस्थिती निर्माण झाली आहे. दरम्यान पुराच्या पाण्याच्या जोरदार प्रवाहामुळे गावात जाणारा पूल तुटण्याच्या परिस्थितीत होता,तरीही देखील गावातील अनेक लोक जीवावर बेतून तो पूल पार करत होते. दरम्यान तिथे एक माय-लेक तो पुल पार करत होत्या मात्र, पाण्याचा जोर सहन न झाल्याने पुल कोसळतो आणि दोघींया पाण्यात पडतात आणि पाण्याच्या जोरदार प्रवाहासोबत वाहून जातात.

धक्कादायक म्हणजे,आजूबाजूला उभे असलेले लोक आरडाओरड करत असले तरी कुणीही त्यांना वाचवण्यासाठी पुढे सरसावले नाही.हा सर्व प्रसंग एखाद्याने आपल्या मोबाईलमध्ये शूट केला असून, तो सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे.

ही घटना नेमकी कुठली आहे ते अद्याप समजू शकलेले नाही. पण व्हिडिओ(Video) व्हायरल होताच त्यावर नेटकरी वर्गातून मोठ्या संख्येने प्रतिक्रिया आलेल्या आहेत. एका यूजरने कमेंटमध्ये लिहिले,''खरचं गरज नव्हती ऐवढी घाई करायची'' तर दुसऱ्या यूजरने कमेंट केली,''खुपच भयानक घडले'' अजून एका यूजरने कमेंट केली,''धक्कादायक घटना म्हणाव लागेल'' अशा विविध प्रतिक्रिया आलेल्या आहेत.

टीप : हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याची पडताळणी झालेली नाही. फक्त माहिती म्हणून आम्ही वाचक-प्रेक्षकांपर्यंत ही बाब पोहचवत आहोत. याचं आम्ही कोणत्याही प्रकारे समर्थन करत नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra School: पहिलीच्या वेळापत्रकातून हिंदी हद्दपार, सुधारित वेळापत्रक जाहीर

Shukrawar che Upay: शुक्रवारच्या दिवशी 'या' चमत्कारी उपायांनी नशीब उजळेल; करियर-कुटुंबातील अडखळे होतील दूर

Indore Street Food: फक्त पोहेच नाही, इंदूरची 'हे' स्ट्रीट डिशेस देखील आहेत अव्वल दर्जाचे

Maharashtra Live News Update: विठ्ठलाची पदस्पर्श दर्शन रांग गोपाळपूरपर्यंत जाऊन पोहोचली

Post Office Scheme: पोस्टाची जबरदस्त योजना! एकदा गुंतवणूक करा अन् फक्त व्याजातून दर महिन्याला मिळवा ५५०० रुपये

SCROLL FOR NEXT