Viral Video Saam Tv
व्हायरल न्यूज

Viral Video: किचनमध्ये मोबाईल वापरताय? हा व्हिडीओ पाहून काळजाचा ठोकाच चुकेल

Shocking Video: सोशल मीडियावर सध्या एका महिलेचा धक्कादायक व्हिडिओ व्हायरल होत आहे. व्हिडिओमध्ये रील्स करणं एका महिलेला चांगलच महागात पडलेले आहे.नक्की काय घडले ते एकदा तुम्ही पाहा.

Tanvi Pol

Shocking Women Video: रील्स आणि जीवघेणा स्टंट हे सध्या समीकरण झालेले आहे.गेल्या काही वर्षापासून रील्स बनवण्यासाठी काही नागरिक कोणत्या थराला जातात हे पाहण्यासाठी मिळते.बऱ्याचदा केलेल्या स्टंटमुळे नकळत अनेकांना आपला जीवही गमवावा लागला आहे.सध्या असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर पाहण्यासाठी मिळत आहे.ज्यात एक महिला किचन ओट्यावर रील्स बनवत होती मात्र गॅस चालू असल्याने अत्यंत भयानक घडते.

घरातील गॅस(Gas) असो वा लाईट्स दोन्ही गोष्टी दिसतात तितक्या अत्यंत भयानाक आहेत.सोशल मीडियावर गॅसच्या स्फोटमुळे संपूर्ण घर जळाल्याच्या घटना ऐकण्यास मिळतात.ऐवढेच नाही तर आगीशी खेळणारे आपण अनेक व्यक्ती पाहिले मात्र सध्या व्हायरल होत असलेला व्हिडिओ पाहून तुमच्या अंगावर शहारे येतील.

व्हायरल होत असलेला व्हिडिओत तुम्हाला एक महिला किचन ओट्यावर बसलेली दिसत आहे आणि ओट्यावर ती चालू गॅसच्या बाजूला बसलेली आहे.काही वेळात ती मोबाईल गॅसच्या बाजूला ठेवण्यास जाते मात्र गॅस चालू असल्याने तीच्या ओढणीला आग लागली जाते.मात्र वेळेवर महिला तेथून उठल्याने बचावली जाते.संपूर्ण धक्कादायक घटना कॅमेऱ्यात कैद झालेली आहे.

व्हिडिओ(Video) सध्या '_sapana_singh88' या अकाउंटवर अपलोड करण्यात आलेला आहे.आतापर्यंत व्हिडिओला लाखोंच्या संख्येने व्ह्यूज मिळाले आहेत तर अनेक प्रतिक्रियाही मिळत आहेत.त्यातील एका यूजरने कमेंट केली आहे,''गरज काय स्वंयपाक करताना मोबाईलची'' तर दुसऱ्या एका यूजरने कमेंट केली आहे,''भारी रिल केली मॅडम'',अशा अनेक संतापजनक प्रतिक्रिया आलेल्या आहेत.

टीप: महिलेचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याची पडताळणी झालेली नाही. फक्त माहिती म्हणून आम्ही वाचक-प्रेक्षकांपर्यंत ही बाब पोहचवत आहोत. याचं आम्ही कोणत्याही प्रकारे समर्थन करत नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Prince Yadav: एका चेंडूनं बदललं प्रिन्स यादवचं नशीब; टीम इंडियामध्ये कशी मिळाली संधी?

Bhiwandi: 306 जिलेटिनच्या कांड्या अन् 110 डेटोनेटर जप्त, माजी महापौराच्या भावासह विरोधात गुन्हा; भिवंडीत मोठी कारवाई

Maharashtra News Live Update: संगमनेरमध्ये खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांचा पुतळा जाळला

जिमचे पैसे खरोखर वाचतील! घरच्या घरी 'हे' 12 व्यायाम करा, 30 दिवसांत कमी होईल 6 किलो वजन

Tea and Biscuit: तुम्हालाही चहा-बिस्कीट खाण्याची सवय आहे? मग शरीरावर होऊ शकतात हे 7 परिणाम

SCROLL FOR NEXT