Bihar Crime Saam Tv
व्हायरल न्यूज

Bihar Crime: तनिष्क ज्वेलर्समध्ये दिवसाढवळ्या दरोडा,२० मिनिटात २५ लाखांचं सोनं लुटलं; VIDEO पाहून बसेल धक्का

Robbery Cctv Video: बिहारमध्ये दिवसाढवळ्या दरोडा टाकल्याची धक्कादायक घडली आहे. या घटनेत चोरट्यांनी अनेक लाखांच्या दागिन्यांची चोरी केली आहे. सध्या याचा सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल होत आहे.

Tanvi Pol

बिहारमध्ये सोमवारी दिवसाढवळ्या बंदुकीच्या धाकावर तनिष्क शोरुममध्ये चोरट्यांनी दरोडा टाकल्याचा थरारक व्हिडिओ समोर आला आहे. काही चोरट्यांनी दुराकात घुसून थेट सुरक्षा कर्मचाऱ्यांना मारहाण केली आणि दुकानामधील ग्राहकांना बंदी केले शिवाय त्यानंतर २५ लाख रुपयांचे दागिने घेऊन ते पसार झाले.

शोरुममध्ये घुसताच गोंधळ, थरारक व्हिडिओ आला समोर

मिळालेल्या माहितीनुसार, सोमवारी सकाळी १०.३० वाजेच्या जवळपास तनिष्क शोरुममध्ये दरोडा पडला. त्यानंतर तोंडाला मास्क घातलेले चोरटे शोरमध्ये घुसले आणि तिथे असलेल्या ग्राहकांना हात वर करण्यास सांगितले, त्यानंतर ग्राहकांमध्ये तनिष्क शोरुममधील कर्मचाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले. चोरऱ्यांटी बंदुकीच्या धाकावर शोरुमधील सर्व तनिष्क शोरुममधील सोने, चांदी आणि हिऱ्यांच्या दागिने लुटले.सर्व प्रकार शोरुमधील सीसीटीव्हीमध्ये(cctv) कैद झालेला आहे.

संपूर्ण घटनेचा व्हिडिओ एक्स या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर व्हायरल होत असून एक्सच्या @nabilajamal_या अकाउंटवर शेअर करण्यात आलेला आहे. सोशल मीडियावर या पूर्वीही लूटमारीच्या, चोरीच्या असंख्य घटनांचे व्हिडिओ पाहण्यासाठी मिळालेले आहेत. त्यात तुम्हाला चोरट्यांनी चोरी करण्याच्या नवनवीन आयडीया कशा वापरल्या ते पाहण्यासाठी मिळाले असेल. मात्र सध्याचा चोरीचा थरार पाहून प्रत्येकजण हैराण झालेले आहे.

चोरीच्या (Theft) या घटनेनंतर, पोलिसांनी कडक कारवाई करण्याचे आदेश दिले असून संपूर्ण शहरात वाहनांची कसून तपासणी करण्यात येत आहे. मात्र, सोशल मीडियाच्या माध्यमातून या घटनेवर लोकांनी अनेक प्रतिक्रिया केलेल्या आहेत. त्यातील एका यूजर्संनी हैराणजनक प्रतिक्रिया केलेल्या आहे तर काहींनी संताप व्यक्त केलेला आहे.

टीप: तनिष्क शोरुमध्ये घडलेल्या घटनेचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याची पडताळणी झालेली नाही. फक्त माहिती म्हणून आम्ही वाचक-प्रेक्षकांपर्यंत ही बाब पोहचवत आहोत. याचं आम्ही कोणत्याही प्रकारे समर्थन करत नाही

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Success Story: रिलस्टार ते डेप्युटी कलेक्टर! दुसऱ्या प्रयत्नात केली MPPSC क्रॅक; हर्षिता दवे यांचा प्रवास

Maharashtra Live News Update : नगरमधील पॅथॉलॉजिकल लॅबचे तज्ञ डॉक्टरांवर गंभीर गुन्हे दाखल

राज ठाकरे राजकारणातील नापास माणूस; अजित पवारांच्या पायाची धूळ, सदावर्तेंनी पुन्हा डिवचलं

Smriti Mandhana Marriage: स्मृती मानधनाचं ठरलं! कोणाशी बांधणार लगीनगाठ?

Kalyan : कल्याणमध्ये केडीएमसीच्या घंटागाडीची दुचाकीला धडक; दुचाकीस्वार गंभीर जखमी, व्हिडिओ व्हायरल

SCROLL FOR NEXT