Viral Video Saam Tv
व्हायरल न्यूज

Viral Video: सांबरमध्ये आढळला मेलेला उंदीर, प्रसिद्ध हॉटेलमधील धक्कादायक प्रकार, VIDEO तुफान व्हायरल

Shocking Viral Video: सोशल मीडिया गेल्या काही दिवसांपासून अनेक धक्कादायक व्हिडिओ व्हायरल होत आहेत. त्यातील काही व्हिडिओ हे अन्नपदार्थांमध्ये झुरळ तर कधी काही सापडताना दिसत आहेत.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

सोशल मीडियावर दिवसेंदिवस खाद्यपदार्थां संबंधित अनेक खळबळजनक व्हिडिओ व्हायरल होत आहेत. व्हायरल होत असलेले व्हिडिओ पाहून बाहेरील अन्नपदार्थ खावे की नाही असा मोठा प्रश्न उपस्थित राहतो. मात्र अन्नपदार्थां निगडित पुन्हा एक धक्कादायक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. ज्या व्हिडिओ एका हॉटेलमधील खाद्यपदार्थांमध्ये मृत उंदीर आढळून आलेला आहे. सध्या सर्वत्र या घटनेने खळबळ उडाली असून व्हिडिओची नेटकऱ्यांमध्ये मोठी चर्चा होत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार व्हायरल होत असलेला प्रकार हा अहमदाबादमधील असून २० जून रोजी समोर आला आहे. २० जून रोजी अहमदाबादमधील एक रहिवासी त्यांच्या जवळील एका हॉटेलमध्ये इटली सांबर खाण्यासाठी गेले होते. त्यावेळी त्यांनी सांबर मागवले असता त्यामध्ये त्यांनी मेलेला उंदीर आढळून आला. या धक्कादायक(Shocking) घटनेनंतर त्यांनी व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला असून तो आता मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

अहमदाबादमधील त्या व्यक्तीने महापालिकेत(muncipal corporation) तक्रार दाखल केली असता ते हॉटेल सध्या सील केले आहे. मात्र गेल्या अनेक महिन्यांपासून खाद्यपदार्थांमध्ये झुरळ सापडणे किंवा आईस्क्रिममध्ये मानवी बोट सापडणे असे प्रकार वारंवार होताना दिसून येत आहे.

सध्या हा व्हिडिओ(Video) इन्स्टाग्रावरील ' @ahmedabad.updates'या अकाउंटवर शेअर करण्यात आलेला आहे. व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर नेटकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. त्यातील एका यूजरने लिहिले आहे की,' देवा हे काय सगळीकडे सुरु आहे', तर आणखी एक यूजरने लिहिले आहे की,' बाहेर राहणाऱ्य़ा व्यक्तींनी आता काय करावे'.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: महाराष्ट्रात वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता

Shukra Gochar: दिवाळीनंतर शुक्र ग्रह करणार गोचर; 'या' राशींना बिझनेसमधून मिळणार भरपूर नफा

Akola News : मोबाईल विहिरीत पडला; अकोल्यातील पठ्ठ्याने अख्खी यंत्रणा कामाला लावली, नेमकं काय घडलं? VIDEO

India vs Pakistan : भारत-पाकिस्तानची मॅच दाखवाल तर टीव्ही फोडणार; ठाकरे गटाचा हॉटेल मालकांना इशारा

Jeans: जीन्स खरेदी करताना लक्षात ठेवा 'या' ५ गोष्टी

SCROLL FOR NEXT